शिल्पा शेट्टीचा पती ‘राज कुंद्रा’ला ही अभिनेत्री पाठवत होती अश्लील व्हिडिओ? गंभीर आरोप वाचले का?
याच प्रकरणात राज कुंद्रा याला तब्बल दोन महिने जेलमध्ये राहण्याची वेळ आली. दोन महिन्यानंतर जामिनावर राज कुंद्रा बाहेर आला.
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात आल्यानंतर अनेकांना मोठा धक्काच बसला होता. 2021 मध्ये राज कुंद्राचे हे प्रकरण उघडकीस आले होते, इतकेच नाही तर याच प्रकरणात राज कुंद्रा याला तब्बल दोन महिने जेलमध्ये राहण्याची वेळ आली. दोन महिन्यानंतर जामिनावर राज कुंद्रा बाहेर आला. यादरम्यान शिल्पा शेट्टीवरही अनेकांनी टीका केली. पोर्नोग्राफी प्रकरणात एका व्यावसायिकाच्या सांगण्यावरून आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राज कुंद्राने केला होता.
राज कुंद्रा जेलमध्ये असताना अभिनेत्री शर्लिन चोप्राने त्याच्या विरोधात मोर्चा वळवला होता. यादरम्यान शर्लिनने राज कुंद्रावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. साजिद खान बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून शर्लिन चोप्रा पोलिस स्टेशनमध्ये सारख्या चकरा मारत आहे. साजिद खानला बिग बाॅसच्या घराबाहेर काढण्यासाठी शर्लिन प्रयत्न करत आहे. बिग बाॅसच्या घरात साजिदला पाहून तिने बिग बाॅसच्या निर्मात्यांवर आणि सलमान खानवरही टीका केली.
मीडियासमोर शर्लिन साजिद खानवर गंभीर आरोप करत आहे. साजिद खानच्या बचावासाठी राखी सावंत मैदानात आलीये. साजिद माझा भाऊ असून त्याने काहीच चुकीचे केले नाही, शर्लिन खोटे आरोप करत असल्याचे काही दिवसांपूर्वी राखी सावंत म्हणाली होती आणि शर्लिनच्या रडण्याची अॅक्टिंग राखीने करून दाखवली होती. त्यानंतर शर्लिनकडूनही राखीला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. दोघीपण दररोज ऐकमेंकीवर टीका करत आहेत.
राखी आण शर्लिनच्या वादात आता थेट शिल्पा शेट्टीचा पती म्हणजेच राज कुंद्राने उडी घेतलीये. शर्लिनवर अत्यंत गंभीर आरोप हे राज कुंद्राने केले असून राज कुंद्रा म्हणाला की, दुसऱ्यांवर आरोप करणारी ही शर्लिन चोप्रा तिचे स्वतःचे अश्लील व्हिडिओ अपलोड करते…ट्विटवर पोस्ट शेअर करत राज कुंद्राने लिहिले की, शर्लिन चोप्रा ट्विट करण्याच्या लायकीची नाही, पण ती कशी कायदेशीर नोटीस पाठवून तिचा चुकीचा मुद्दा सिद्ध करत आहे. तिने स्वत:चे पोर्नोग्राफिक कन्टेंट अपलोड केला आहे आणि आता ती पायरेटेड आणि व्हायरल असल्याचे बोलते आहे.