Video | घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाच राजीव सेन आणि चारू असोपा यांचा तो व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना धक्का
गेल्या काही दिवसांपासून राजीव सेन आणि चारू असोपा यांच्यामध्ये वाद बघायला मिळत होता. मात्र, नुकताच व्हायरल झालेला चारू आणि राजीव यांच्या व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) आणि त्याची पत्नी चारू असोपा यांनी काही दिवसांपूर्वी एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. इतकेच नाही तर लवकरच यांचा घटस्फोट देखील होणार आहे. चारू असोपा हिने राजीव सेन याने आपल्याला धोका दिल्याचे म्हटले होते. त्यानंतर राजीव सेन याने चारू असोपा हिचे एका मोठ्या टीव्ही अभिनेत्यासोबत अफेअर सुरू असल्याचे म्हटले होते. बरेच दिवस हे आरोप प्रत्यारोपाचे सत्र यांच्यामध्ये सुरू होते. दोघेही सोशल मीडियावर व्हिडीओ (Video) शेअर करून एकमेकांवर आरोप करायचे. या दोघांची एक मुलगी देखील आहे. चारू असोपा ही मुंबईमध्ये वेगळी राहते. चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या मुलीचे नाव जियाना असे आहे.
काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत चारू असोपा हिने आपले संपूर्ण घर चाहत्यांना दाखवले होते. चारू असोपा हिने काही दिवसांपूर्वीच राजीव सेन याचे घर सोडले आहे. मात्र, एका विवाहसोहळ्यामध्ये चारू असोपा आणि राजीव सेन एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे या विवाहसोहळ्यात सुष्मिता सेन हिने देखील हजेरी लावली होती.
राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये मोठे वादळ आलेले असतानाच आता चारू असोपा हिच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये चारू असोपा आणि राजीव सेन हे दोघेही खूप जास्त आनंदी असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओही चारू असोपा हिने शेअर केलाय.
View this post on Instagram
नुकताच चारू असोपा हिचा वाढदिवस झालाय. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये चारू असोपा हिचा पती राजीन सेन देखील दिसत आहे. हे दोघेही एकमेकांना प्रेमाने केक खाऊ घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना चारू असोपा हिने राजीव सेन याचे धन्यवाद मानले आहेत. वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन केल्याबद्दल.
हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मोठे भांडणे सुरू होते. राजीव सेन यानेही चारू असोपा हिच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोवर आणि व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
यापूर्वीही काही वर्षांपूर्वी राजीव सेन आणि चारू असोपा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही दिवसांनी यांच्यामध्ये सर्वकाही ठिक झाले. आताही यांच्यामध्ये वाद गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत होता. मात्र, चारू असोपा हिच्या वाढदिवसाचे फोटो पाहून कळत आहे की, यांच्यामध्ये परत एकदा सर्व व्यवस्थित झाले आहे.