बॅगमधील ती वस्तू पाहून हादरली, सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याच्यावर पत्नीचे आरोप, नातं तुटतंय….
चारू असोपा हिने राजीव याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. चारूने नुकताच एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राजीव सेन याची पत्नी चारू असोपा हिने राजीव याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. चारूने नुकताच एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केलाय. चारू गरोदर असताना राजीव तिला धोका देत असल्याचे तिने म्हटले आहे. राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या नात्यासंदर्भात दररोज धक्कादायक खुलासे केले जात आहेत.
नुकताच पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चारू असोपाने म्हटले की, प्रेग्नेंसीनंतर बिकानेरवरून काही महिन्यांनंतर मुंबईत मी आले. त्यावेळी राजीव सकाळी 11 ला घराच्या बाहेर पडायचा आणि थेट रात्री 11 लाच घरी परत यायचा. जेंव्हा जेंव्हा याबद्दल मी राजीवला प्रश्न विचारत होते, त्यावेळी तो मला ट्रॅफिकचे वगैरे कारण सांगत होता.
राजीव मला म्हणायचा की, मी मॅपवर ट्रॅफिक बघतो आणि मग वांद्रे येथील कॉफी हाऊसमध्ये कॉफी पित बसतो आणि ट्रॅफिक कमी होण्याची वाट पाहतो. कधी कधी मी ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी गाडीमध्ये पण झोपतो आणि ट्रॅफिक कमी झाले की, मी घरी येतो. मी राजीवच्या या सर्व बोलण्यावर नेहमीच विश्वास ठेवला.
पुढे चारू असोपा म्हणाली की, एकदा राजीव मला न सांगता दिल्लीला निघून गेला. मी घर आवरत असताना मला राजीवच्या बॅगेमध्ये असे काहीतरी सापडले आणि मला समजले की, राजीव मला धोका देतोय. यानंतर याची सर्व माहिती मी कुटुंबीयांना दिली. त्याच क्षणी मला वाटले की, मी हे सर्व सोडून इथून निघून जायला हवे.
राजीव याच्यावर माझे खूप प्रेम असल्याने मी प्रत्येक वेळी राजीव आणि माझ्या नात्याला दुसरी संधी दिली. 3.5 वर्षे मी हेच केले. पण मला समजले की, काही गोष्टी बदलने कधीच शक्य नसते. 2021 मध्ये राजीव आणि चारू यांना मुलगी झाली, जिचे नाव जियाना आहे. यावेळी बोलताना चारू म्हणाली की, आता आम्ही 2022 मध्ये घटस्फोट घेणार आहोत.