राजकुमार हिरानी यांनी शाहरुख खान याच्याबद्दल केला मोठा खुलासा, डंकी चित्रपटाच्या सेटवर अभिनेता दोन दिवसांचे शूटिंग फक्त…
शेवटी शाहरुख खान याने चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी अत्यंत खास ठरणार आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे रिलीजला तब्बल 32 दिवस होऊनही शाहरुख खान याचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करताना दिसत आहे. 2019 मध्ये शेवटी शाहरुख खान हा झिरो या चित्रपटामध्ये दिसला होता. मात्र, शाहरुख खान याचा हा चित्रपट (Movie) बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. शाहरुख खान याचा झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर तो मोठ्या पडद्यापासून दूर गेला. तब्बल चार वर्ष शाहरुख खान याने कोणत्याही चित्रपटात झलकही दाखवली नाही. यामुळे शाहरुख खान हा परत बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये दिसणार की, नाही या प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.
शेवटी शाहरुख खान याने चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण यंदा शाहरुख खान याचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान याचा डंकी आणि जवान हे चित्रपट यंदाच रिलीज होणार आहेत. विशेष म्हणजे आता पठाणच्या जबरदस्त यशानंतर या चित्रपटांकडून देखील अपेक्षा वाढल्या आहेत. कोणालाही वाटले नव्हते की, शाहरुख खान अशाप्रकारे पुनरागमन करेल. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत.
नुकताच शाहरुख खान याच्या आगामी डंकी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये त्यांनी शाहरुख खान याच्या मेहनतीविषयी महत्वाची माहिती सांगितली आहे. इतकेच नाही तर अगदी कमी दिवसांमध्ये शाहरुख खान याने कशाप्रकारे चित्रपटाची शूटिंग संपवली हे देखील त्यांनी सांगितले.
राजकुमार हिरानी म्हणाले की, शाहरुख खान हा ज्यावेळी सेटवर असायचा त्यावेळी सेटवरील वातावरण अगदी आनंदी असायचे. शाहरुख खान हा शूटिंगसाठी सकाळी सात वाजताच हजर असायचा. शाहरुख खान याला इतक्या सकाळी सेटवर पाहून माझ्यासह सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. शाहरुख खान हा प्रचंड मेहनती आहे.
पुढे राजकुमार हिरानी म्हणाले, एखाद्या सूटसाठी मी दोन दिवसांचा वेळ दिला तिथे शाहरुख खान याने फक्त दोन तासांमध्येच शूटिंग संपवून टाकली. मुळात म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत काम करून खूप आनंद मिळतो. शाहरुख खान त्याच्या पात्रासाठी खूप जास्त मेहनत घेतो आणि त्याच्या आजूबाजुच्या लोकांना आनंदी ठेवतो.