‘तू आम्हाला सोडून 6 वर्षे झाली पण..’; राजकुमार रावची भावूक पोस्ट
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. जागतिक महिला दिनानिमित्त (Women’s Day) राजकुमारने सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच त्याने त्याच्या आयुष्यातील भावनिक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राजकुमारच्या लग्नाच्या दिवसाचा हा फोटो आहे. आईच्या फोटो फ्रेमसमोर राजकुमार आणि त्याची पत्नी […]
आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. जागतिक महिला दिनानिमित्त (Women’s Day) राजकुमारने सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच त्याने त्याच्या आयुष्यातील भावनिक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राजकुमारच्या लग्नाच्या दिवसाचा हा फोटो आहे. आईच्या फोटो फ्रेमसमोर राजकुमार आणि त्याची पत्नी पत्रलेखा (Patralekhaa) उभे आहेत. राजकुमार त्याच्या आईच्या फोटोकडे अत्यंत प्रेमाने पाहत असल्याचं दिसत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत, फोटो शेअर केले आहेत. राजकुमारने त्याच्या दिवंगत आईच्या आठवणीत ही खास पोस्ट लिहिली आहे.
राजकुमार रावची पोस्ट-
‘माँ, तू आम्हाला सोडून 6 वर्षे झाली पण मला माहित आहे की तू नेहमी माझ्यासोबत आहेस. मी तुला नेहमी माझ्या हृदयात ठेवीन आणि मला माहित आहे की तू नेहमीच मला मार्गदर्शन करण्यासाठी, माझं रक्षण करण्यासाठी, माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी तिथे आहेस. तू नेहमीच माझा हिरो राहशील. खूप प्रेम माँ’, अशा शब्दांत राजकुमारने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
राजकुमारच्या या पोस्टवर पत्नी पत्रलेखाने कमेंट केली, ‘माँ तुला वरून पाहत असेल आणि नेहमीच तुझ्यासोबत असेल.’ कॉमेडियन मल्लिका दुआँने राजकुमारच्या या पोस्टवर हृदयाचे पोस्ट केले आहेत. अनेकांनी राजकुमारच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. राजकुमारने गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी प्रेयसी पत्रलेखाशी लग्नगाठ बांधली. चंदिगडमध्ये या दोघांना विवाहसोहळा पार पडला. पत्रलेखा आणि राजकुमार लग्नाआधी 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
हेही वाचा:
यश देशमुख स्वत:च्या आईचं लग्न लावून देणार? ‘आई कुठे काय करते’ निर्णायकी वळणावर?
‘आई कुठे काय करते’चे डायलॉग्स कसे लिहिले जातात, त्यामागे काय असतो विचार?