आर्थिक संकटात असताना बॉलिवूडनेच मदत केली, राजपाल यादवने सांगितली व्यथा!

नुकत्याच झालेल्या एका रेडिओ मुलाखती दरम्यान राजपाल यादव याने आपल्या या कठीण परिस्थितीवर खुलेपणाने भाष्य केले आहे.

आर्थिक संकटात असताना बॉलिवूडनेच मदत केली, राजपाल यादवने सांगितली व्यथा!
राजपाल यादव
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 10:27 AM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) शेवटच्या वेळी ‘कुली नंबर 1’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात तो वरुण धवन, सारा अली खानसोबत दिसला होता. राजपाल यादव 2017 मध्ये खूपच अस्वस्थ झाले होते. यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती देखील अजिबात ठीक नव्हती. 5 कोटींचे कर्ज परतफेड करू न शकल्यामुळे अभिनेत्याला 2018 मध्ये तुरूंगात देखील जावे लागले होते.

नुकत्याच झालेल्या एका रेडिओ मुलाखती दरम्यान राजपाल यादव याने आपल्या या कठीण परिस्थितीवर खुलेपणाने भाष्य केले आहे. त्यांच्या या वाईट काळात त्यांना सर्वात जास्त मदत कोणी केली?, असे विचारले असता, अभिनेता म्हणाला की, जर त्यावेळी काही लोकांनी त्याला मदत केली, नसती तर आज तो इथे नसता.

मला माहित होते…

राजपाल म्हणाला की, प्रत्येकजण आपल्यासोबत आहे हे मला ठाऊक होते. ज्यामुळे त्याला या टप्प्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळाली आणि तो या वेळेला सहज समोर गेला. आपल्या मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या जुन्या दिवसांबद्दल बोलताना सांगितले की, जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा अनेक समस्या येत होत्या, परंतु त्याने सतत काम केले आणि कोणतेही काम नाकारले नाही.

‘हंगामा 2’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेता राजपाल यादव लवकरच शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मीझान जाफरी यांच्या ‘हंगामा 2’ या चित्रपटात दिसणार आहेत. आता अशी देखील चर्चा आहे की, राजपाल यादव आपल्या वडिलांचेही नाव आपल्या नावात जोडणार आहेत. म्हणजेच आता त्याला ‘राजपाल नौरंग यादव’ या नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अभिनेत्याने सांगितले की, त्याच्या वडिलांचे नाव त्याच्या पासपोर्टवर आहे, परंतु आता हे नावदेखील सिनेमात पहायचे आहे. म्हणूनच त्याने आता वडिलांचे नाव लावण्यास सुरूवात केली आहे.

अभिनेता सतत चित्रपटांमध्ये काम करत असतो. तो कोणतेही काम नाकारत नाही. या लॉकडाऊनमध्ये त्याने बर्‍याच मोठ्या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. येत्या काही दिवसांत त्याचे पुढील चित्रपट जाहीर होणार आहेत, असे या अभिनेत्याचे म्हणणे आहे. ज्यासाठी तो आता पूर्णपणे तयार आहे.

(Rajpal Yadav says Bollywood helped only when there was financial crisis)

हेही वाचा :

Top 5 Non Fiction Celebrites: छोट्या पडद्यावर गाजले, आता ‘या’ पाच कलाकारांची सोशल मीडियावरही धूम

Photoshop Magic: ‘या’ अभिनेत्रींना ओळखलंत?, फोटो बघताच शाहरुख सलमान आणि आमिरलाही बसेल धक्का

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.