राघव चढ्ढा तर तुझा चढ्ढा उतरवेन, राखी सावंत आप आमदारावर का भडकली? नेमकं काय घडलं?
आम आदमी पार्टीचे (Aam Adami Party) आमदार राघव चढ्ढा यांच्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. राघव चढ्ढा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं अभिनेत्री राखी सावंत भडकली आहे.

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीचे (Aam Adami Party) आमदार राघव चढ्ढा यांच्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. राघव चढ्ढा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं अभिनेत्री राखी सावंत भडकली आहे. राखी सावंत हिनं आपच्या आमदाराला चांगलंच खडसावलं आहे. राघव चढ्ढा यांनी पंजाबच्या राजकारणावरुन टीका केली होती. राघव चढ्ढानं नवज्योतसिंग सिद्धूची तुलना राखी सावंतशी केली होती. शनिवारी राघवने आपल्या एका ट्विटमध्ये सिद्धू पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत असल्याचे म्हटले होते. माध्यमांशी बोलताना राखी सावंतने राघव चढ्ढाला इशारा दिला असून पुढं जर तिचं नाव घेतल्यास चांगलाच धडा शिकवेन, असं ती म्हणाली आहे.
माझ्यापासून दूर राहा
राघव चड्ढा माझ्यापासून आणि माझ्या नावापासून दूर राहा, असा इशारा राखी सावंतनं दिला आहे. “मिस्टर चड्ढा हो ना, मेरा नाम लोगे तो तुम्हारा चढ्ढा उतार दुंगी” अशा शब्दात राखी सावंतनं राघव चढ्ढावर हल्लाबोल केला. मिस्टर चड्ढा तुमचं तुम्ही पाहून घ्या, ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी माझ्या नावाची गरज पडली. त्यामुळे मी ट्रेंडिंगमध्ये कशी राहते याचा विचार करा, असंही राखी सावंत म्हणाली. राखी पुढे म्हणाली की तिचा पती रितेश यानं देखील तिच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राघव चढ्ढाचा राजीनामा घ्यावा, अशी विनंती रितेशनं केल्याची माहिती राखी सावंत हिनं दिलीय.
The Rakhi Sawant of Punjab politics -Navjot Singh Sidhu- has received a scolding from Congress high command for non stop rant against Capt. Therefore today,for a change, he went after Arvind Kejriwal. Wait till tomorrow for he shall resume his diatribe against Capt with vehemence https://t.co/9SDr8js8tA
— Raghav Chadha (@raghav_chadha) September 17, 2021
राखीच्या पतीनंही सुनावलं
मिड-डे मधील एका रिपोर्टनुसार, रितेशनं राघव चढ्ढावर हल्लाबोल केला आहे. महिलांबाबत अशा प्रकारचा विचार करणे अत्यंत चुकीचे आहे. आपच्या आमदारानं आपल्या भाषेची मर्यादा सांभाळावी, असं रितेशनं म्हटलं आहे. तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी कोणाचे वैयक्तिक आयुष्य खराब करू शकत नाही, असं रितेश म्हणाला. मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो, परंतु, तुम्ही परिपक्व राजकारणी नाही त्यामुळं मी तुम्हाला एक अपरिपक्व व्यक्ती म्हणून सोडत आहे, असंही राखीच्या पतीनं म्हटलं आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राजीनामा दिला. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी राघव चड्ढा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले होते. पंजाबच्या राजकारणाची राखी सावंत असं त्या ट्विटमध्ये लिहिलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात सतत भूमिका घेतल्या बद्दल नवज्योतसिंग सिद्धूने काँग्रेस हायकमांडला फटकारले असल्याचं राघव चढ्ढा म्हणाले होते.
इतर बातम्या:
Rakhi sawant lashes out on aap mla raghav chadha on comparing her with navjot singh sidhu