कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाविषयी बोलताना राखी सावंत हिची जीभ घसरली, म्हणाली मला किळस…
आदिल दुर्रानी याच्यासोबत खूप जास्त आनंदी दिसत होती. शर्लिन चोप्रा प्रकरणात ज्यावेळी राखी सावंत हिला पोलिसांनी चाैकशीसाठी बोलावले होते, त्यावेळी आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिच्यासोबत दिसत होता.
मुंबई : राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांचा वाद थेट कोर्टामध्ये पोहचला आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) हिने काही दिवसांपूर्वी आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत हिने सोशल मीडियावर आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे फोटो शेअर करण्याच्या तब्बल सात महिने अगोदरच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी अगोदर कोर्टात लग्न केले आणि मग निकाह केला. इतकेच नाही तर राखी सावंत हिने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारत आपले स्वत: चे नावही बदलून फातिमा आदिल दुर्रानी असे ठेवले होते. अनेकदा आदिल दुर्रानी आणि राखीसोबत स्पाॅट व्हायचे. राखी सावंत ही आदिल दुर्रानी याच्यासोबत खूप जास्त आनंदी दिसत होती. शर्लिन चोप्रा प्रकरणात ज्यावेळी राखी सावंत हिला पोलिसांनी चाैकशीसाठी बोलावले होते, त्यावेळी आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिच्यासोबत दिसत होता.
इतकेच नाही तर राखी सावंत हिच्या आईच्या निधनानंतरही तो राखी सावंत हिच्यासोबत होता. राखी सावंत हिची आई दवाखान्यात असतानाच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी आपल्याला धोका देत असल्याचे म्हटले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी परत एकदा राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्या नात्यामधील तणाव बाहेर आला.
आदिल दुर्रानी याच्यावर राखी सावंत हिने आतापर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत. आदिल दुर्रानी याचे तनू नावाच्या मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचे राखी सावंत हिने सांगत थेट म्हटले होते की, माझ्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर त्याचे लग्न झाले होते, जे मला आता कळाले.
मला धोका देऊन आता त्याला तनू नावाच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे. म्हणजेच त्याला तिसरे लग्न करायचे आहे. इतकेच नाही तर आपले खासगी व्हिडीओ आदिल दुर्रानी याने विकल्याचे देखील राखी सावंत हिने म्हटले आहे.
माझे न्यूड फोटो आणि व्हिडीओ आदिल दुर्रानी याने विकले असल्याचे राखी सावंत म्हणाली. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याने माझे दिड कोटी घेतल्याचा देखील दावा केला आहे. नुकताच राखी सावंत हिने कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाबाबत मोठे भाष्य केले आहे.
राखी म्हणाली की, सर्वत्र कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. इतक्या छान यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत आणि माझ्या लग्नाचे काय झाले? हे सर्व बोलताना राखी सावंत हिला तिचे अश्रू रोखणे अवघड झाले होते. राखी म्हणाली की, मला कुठे लग्न बघितले की, आता किळस (घिन) येते. कोणत्याही जोडप्याला सोबत मी बघितले की, मला रडू येते.