Ranveer Singh: “जर स्त्री आपलं शरीर दाखवू शकते तर..”, रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरून राम गोपाल वर्मा यांचा सवाल

एका मासिकासाठी रणवीरने हे फोटोशूट केलं होतं. इंडस्ट्रीतील काही लोक त्याला पाठिंबा देत आहेत तर नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीका होत आहे. याप्रकरणी रणवीरविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Ranveer Singh: जर स्त्री आपलं शरीर दाखवू शकते तर.., रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरून राम गोपाल वर्मा यांचा सवाल
Ranveer Singh and Ram Gopal VarmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 9:31 AM

अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटचे (Nude Photoshoot) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका मासिकासाठी रणवीरने हे फोटोशूट केलं होतं. इंडस्ट्रीतील काही लोक त्याला पाठिंबा देत आहेत तर नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीका होत आहे. याप्रकरणी रणवीरविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीतील बहुतांश लोकांनी रणवीरला पाठिंबा दिला असला असून आता चित्रपट निर्माते राम गोपाल वर्माही (Ram Gopal Varma) त्याच्या समर्थनात उतरले आहेत.

‘पुरुष त्यांचं शरीर का दाखवू शकत नाहीत’

अलीकडेच ‘गर्ल’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या राम गोपाल वर्मा यांनी रणवीरचं न्यूड फोटोशूट हे लैंगिक समानतेचं उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “लैंगिक समानतेची मागणी करण्याचा हा त्याचा अनोखा मार्ग आहे. जर स्त्री आपलं सेक्सी शरीर दाखवू शकते तर पुरुष का नाही दाखवू शकत? पुरुषांना वेगवेगळ्या मापदंडांनी न्याय द्यावा हा एकंदर ढोंग आहे. पुरुषांनाही स्त्रियांप्रमाणे समान अधिकार मिळाले पाहिजेत.

हे सुद्धा वाचा

आलियाने रणवीरचा केला बचाव

आलिया भट्टने तिच्या आगामी ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली. एका पत्रकाराने आलियाला या फोटोंवरून होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारला तेव्हा आलियाने त्याने बचाव करताना सांगितलं की, “मला माझ्या आवडत्या रणवीर सिंगबद्दल काहीही नकारात्मक ऐकायला आणि बोलायला आवडत नाही. कलाकार म्हणून मला तो नेहमी आवडतो आणि तो फक्त माझाच नाही तर अनेकांना आवडता अभिनेता आहे. रणवीरने बॉलिवूडमध्ये अप्रतिम चित्रपटात काम केले आहेत, त्यामुळे आपण त्याला फक्त प्रेम दिलं पाहिजे.”

अर्जुन कपूरची प्रतिक्रिया

आलियापूर्वी अभिनेता अर्जुन कपूरने रणवीरच्या बाजूने प्रतिक्रिया दिली होती. न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया देताना अर्जुन म्हणाला होता, “रणवीर कधीच दिखावा करत नाही. जर तुम्ही रणवीर सिंगला 11-12 वर्षांपासून ओळखत असाल तर तुम्हाला हे देखील माहित असेल की तो जे काही करतो तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे. त्याने जे काही केलं ते त्याची निवड, त्याचा सोशल मीडिया आणि त्याला जे काही सोयीचं वाटतं त्यानुसार केलं. मला वाटतं की आपण त्याचा आदर केला पाहिजे.”

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.