Ranbir Alia Wedding LIVE updates: रणबीर-आलियाच्या लग्नाचे फोटो आले समोर

| Updated on: Apr 14, 2022 | 7:53 PM

Ranbir Alia Wedding: या लग्नसोहळ्याला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. रणबीर-आलिया गेल्या काही वर्षांपासून एकमेकांंना डेट करत आहेत.

Ranbir Alia Wedding LIVE updates: रणबीर-आलियाच्या लग्नाचे फोटो आले समोर
Ranbir Alia wedding first picsImage Credit source: Instagram

Ranbir-Alia Wedding LIVE updates: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत आहेत. 13 एप्रिलपासून रणबीर-आलियाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. आज (14 एप्रिल) रणबीर-आलियाचा लग्नसोहळा पार पडला. रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी मेहंदी आणि लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. रणबीर-आलिया गेल्या काही वर्षांपासून एकमेकांंना डेट करत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आता बॉलिवूडची ही लोकप्रिय जोडी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत असून या दोघांवर सध्या कलाविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Apr 2022 07:34 PM (IST)

    आलिया भट्टने पोस्ट केले लग्नाचे खास क्षण

    आलिया भट्टने अखेर लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. पहा रणबीर-आलियाच्या लग्नातील खास क्षण

  • 14 Apr 2022 07:07 PM (IST)

    करीनाने शेअर केला खास फोटो

    रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नानंतर आता चाहत्यांना त्यांच्या फोटोंची प्रतीक्षा आहे. त्याआधी करीना कपूर खानने मुलगा जेहसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत गुलाबी रंगाच्या कुर्त्यामध्ये जेह खूपच गोड दिसत आहे.

  • 14 Apr 2022 06:58 PM (IST)

    महेश भट्ट यांच्या हातावरील मेहंदी; जावयाचं लिहिलं नाव

    आलियाचे वडील महेश भट्ट यांच्या हातावरील मेहंदीचा व्हिडीओ समोर आला आहे. महेश भट्ट यांनी त्यांच्या हातावर जावई रणबीरचं नाव लिहिलं आहे.

  • 14 Apr 2022 06:45 PM (IST)

    लग्नानंतर वाटली मिठाई

    रणबीर-आलियाच्या लग्नानंतर बाहेर उपस्थित असलेल्या सर्व फोटोग्राफर्स आणि पापाराझींना लाडू देण्यात आले. यावेळी अल्पोपहाराचे पॅकेट्ससुद्धा पापाराझींमध्ये वाटण्यात आले.

  • 14 Apr 2022 06:19 PM (IST)

    भावाच्या लग्नात करिश्मा-करीनाचा लूक

    रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबद्ध झाले आहेत. दोघांचं लग्न पार पडताच लग्नसोहळ्यातील फोटो समोर येऊ लागले आहेत. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जोहर हा करीना कपूर आणि करिश्मा कपूरसोबत दिसत आहे.

  • 14 Apr 2022 05:11 PM (IST)

    रणबीर-आलियाचा विवाहसोहळा संपन्न

    रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. लग्नाचे सर्व विधी पार पडल्याची माहिती समोर येत आहे.

  • 14 Apr 2022 04:36 PM (IST)

    आज चिंटूला (ऋषी कपूर) इथं असायला हवं होतं- रणधीर कपूर

    “रणबीर-आलियाचं लग्न हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. कुटुंबीयांसाठी हा खूप मोठा दिवस आहे. आज चिंटूला (ऋषी कपूर) इथं असायला हवं होतं. त्याची आम्हाला रोज आठवण येते,” अशी प्रतिक्रिया रणधीर कपूर यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना दिली.

  • 14 Apr 2022 04:31 PM (IST)

    आलिया-रणबीरचं रिसेप्शन होणार नाही

    आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा रिसेप्शन 16 आणि 17 एप्रिल रोजी होणार होता. मात्र, आता यात मोठा बदल करण्यात आला आहे. कोरिओग्राफर राजेंद्र सिंह उर्फ ​​मास्टरजी यांनी सांगितलं की, हे जोडपे आता त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करणार नाही. लग्नात कपूर आणि भट्ट कुटुंबातील कोणताही सदस्य परफॉर्म करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

  • 14 Apr 2022 04:24 PM (IST)

    रणबीरच्या लग्नात आकाश अंबानीची उपस्थिती

    रणबीर कपूरच्या लग्नात आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका पोहोचले आहेत. रणबीरने आकाशला लग्नासाठी आमंत्रण दिल्याचं म्हटलं जात आहे. आकाश आजच परदेशात जाणार होता, पण त्याने मित्र रणबीरच्या लग्नासाठी त्याचा प्लॅन रद्द केला.

  • 14 Apr 2022 03:58 PM (IST)

    आलियाला वधूच्या रुपात पाहून करण जोहर-अयान मुखर्जी भावूक

    निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आलिया भट्टला आपली मुलगी मानतो. लग्नात पोहोचताच करण पहिल्यांदा आलियाला भेटला. यावेळी आलियाचा मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसुद्धा करणसोबत होता. आलियाला भेटल्यानंतर दोघेही भावूक झाले.

  • 14 Apr 2022 03:30 PM (IST)

    नीत कपूर आणि रिधिमा कपूर सहानीचा लूक

    वधूची आई सोनी राजदान लग्नाला पोहोचल्या आहेत. वरपक्षाकडून रणबीरची आई नीतू कपूर, बहीण रिधिमा कपूर सहानी आणि भाची समायरा सहानी यांचा पहिला फोटो समोर आला आहे.

  • 14 Apr 2022 03:22 PM (IST)

    महेश भट्ट मुलगी पूजासोबत लग्नाला पोहोचले

    आलियाचे वडील महेश भट्ट हे मुलगी पूजासोबत लग्नाला पोहोचले आहेत.

  • 14 Apr 2022 03:07 PM (IST)

    करीना-सैफचा खास लूक, पेस्टल कलर्सना पसंती

    रणबीर-आलियाच्या लग्नातील करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लूक समोर आला आहे. करीनाने गुलाबी पेस्टल रंगाची साडी नेसली असून सैफने पांढऱ्या आणि गुलाबी रंगसंगतीचा कुर्ता-जॅकेट परिधान केला आहे. पहा त्यांचे फोटो-

  • 14 Apr 2022 02:35 PM (IST)

    वधूची आई सोनी राजदान विवाहस्थळी पोहोचल्या

    रणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे. हे दोघं थोड्याच वेळात सात फेरे घेणार आहेत. लग्नाचे विधी सुरू होण्यापूर्वी वधूची आई सोनी राजदान आणि बहीण शाहिन यांचे फोटो समोर आले आहेत.

  • 14 Apr 2022 02:18 PM (IST)

    शक्ती कपूर म्हणाले, “आज ऋषी कपूर असते तर…”

    अभिनेते शक्ती कपूर यांनी रणबीर-आलियाच्या विवाहप्रसंगी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आज ऋषी कपूर असते तर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नसता. सर्वांत खूश ते असते”, असं ते म्हणाले.

  • 14 Apr 2022 01:46 PM (IST)

    कपूर कुटुंबीय ‘या’ गाण्यांवर करणार परफॉर्म

    रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नासाठी ढोलिडा, क्यूटी पाय, तेनू लेके में जा वांगा आणि मेहंदी है या गाण्यांवर परफॉर्मन्स तयार करण्यात आले आहेत. या लग्नात नीतू कपूर, करीना कपूर, रिद्धिमा कपूर सहानी यांच्यासह इतर कलाकार परफॉर्म करणार आहेत. अवघ्या 4 ते 5 दिवसात सर्वांनी डान्सची तयारी केली आहे. नीतू कपूर यांच्या घरी रिहर्सल्स करण्यात आले.

  • 14 Apr 2022 12:51 PM (IST)

    भावाच्या लग्नात रिधिमाने नेसली लाखोंची साडी

    रिधिमा कपूरने आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नातील तिचा लूक शेअर केला आहे. पांढऱ्या आणि काळ्या रंगसंगतीत चमचमणारी ही साडी डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केली आहे. त्याची किंमत सुमारे 1 लाख 55 हजार रुपये इतकी आहे.

  • 14 Apr 2022 12:43 PM (IST)

    लग्नानंतर रणबीर करणार सोशल मीडियावर पदार्पण?

    आलियाशी लग्न केल्यानंतर रणबीर कपूर सोशल मीडियावर पदार्पण करणार असल्याचं कळतंय. सोशल मीडियावर चाहत्यांसाठी व्हिडीओ मेसेज पोस्ट करण्याचा सल्ला आलियाने रणबीरला दिला आहे.

  • 14 Apr 2022 12:18 PM (IST)

    वरपक्षाकडून डान्सची तयारी; नीतू कपूर यांनी शेअर केला फोटो

    रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाआधी संगीत सेरेमनीचा फोटो समोर आला आहे. नीतू कपूर यांनी नृत्यदिग्दर्शक मास्टरजींसोबत डान्स रिहर्सलचा फोटो शेअर केला आहे.

  • 14 Apr 2022 12:13 PM (IST)

    रणबीर-आलिया दुपारी 2 ते 5 वाजतादरम्यान घेणार सप्तपदी

    रणबीरच्या वरातीसाठी परवानगी न मिळाल्याने दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान सप्तपदी पार पडणार आहेत. संध्याकाळी 5 नंतर आलिया-रणबीरच्या लग्नाचे फोटो माध्यमांसमोर येणार असल्याचं कळतंय.

  • 14 Apr 2022 11:47 AM (IST)

    रणबीर-आलियाला लागली हळद

    रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा हळदी सोहळा पार पडला. या सोहळ्यात नीतू कपूर, शाहीन भट्ट, सोनी राजदान आणि रिद्धिमा कपूर सहानी उपस्थित होत्या.

  • 14 Apr 2022 11:41 AM (IST)

    आलियाची मैत्रीण अनुष्का रंजनने शेअर केला फोटो

    आलिया भट्टची खास मैत्रीण अनुष्का रंजन लग्नात हजर राहणार आहे. तिने इन्स्टा स्टोरीमध्ये स्वत:चा लूक पोस्ट केला आहे.

  • 14 Apr 2022 11:36 AM (IST)

    नीतू कपूर यांच्या हातावरील मेहंदी

    मुलाच्या लग्नासाठी नीतू कपूर अत्यंत आनंदी आहेत. बुधवारी पार पडलेल्या मेहंदीच्या कार्यक्रमात त्यांनी हातावर मेहंदी काढली आणि त्यात ऋषी असं नावदेखील लिहायला सांगितलं. या मेहंदीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  • 14 Apr 2022 11:02 AM (IST)

    लग्नापूर्वीच्या विधींसाठी नीतू आणि रिधिमा कपूरचा लूक

    रणबीरच्या वास्तू या निवासस्थानी लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वीच्या काही विधींसाठी नीतू आणि रिधिमा कपूर यांनी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. नीतू कपूर यांच्या हातावर रंगलेली मेहंदीसुद्धा या फोटोत पहायला मिळतेय.

  • 14 Apr 2022 10:30 AM (IST)

    मुलीच्या लग्नापूर्वी जुहूमधील घराजवळ महेश भट्ट

    गुरुवारी सकाळी महेश भट्ट यांना जुहूमधल्या त्यांच्या घराजवळ कॅज्युअल लूकमध्ये पाहिलं गेलं. यावेळी त्यांनी पापाराझींना हात दाखवला.

  • 14 Apr 2022 10:11 AM (IST)

    रणबीर-आलियाच्या मेहंदीनंतर करिश्माने पोस्ट केला पहिला फोटो

    रणबीरची बहीण रिधिमा कपूर सहानी आणि चुलत बहिणी करिश्मा, करीना कपूर यांनी मेहंदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर करिश्मा आणि रिधिमाने इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केला. पहा फोटो

  • 14 Apr 2022 09:38 AM (IST)

    पहा रणबीर-आलियाच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो

    रणबीर कपूरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी काल (13 एप्रिल) मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसह विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

  • 14 Apr 2022 09:33 AM (IST)

    नीतू कपूर आणि रिधिमा कपूर सहानी ‘वास्तू’ बंगल्यावर पोहोचल्या

    रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिधिमा कपूर सहानी या ‘वास्तू’ बंगल्यावर पोहोचल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे.

  • 14 Apr 2022 09:25 AM (IST)

    आलियाची आई आणि बहीण विवाहस्थळी पोहोचल्या

    आलियाची आई सोनी राजदान या मोठी मुलगी शाहिनसोबत विवाहस्थळी पोहोचल्या. रणबीरच्या ‘वास्तू’ बंगल्यावरच लग्न पार पडणार आहे.

  • 14 Apr 2022 09:03 AM (IST)

    ‘वास्तू’ बंगल्याला रोषणाई, लग्नाचे विधी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार

    रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाचे विधी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. रणबीरच्या ‘वास्तू’ या बंगल्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या खास दिवसासाठी आलियाचा मेकअप सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट माईकी करणार असल्याचं कळतंय.

    View this post on Instagram

    A post shared by Voompla (@voompla)

  • 14 Apr 2022 08:51 AM (IST)

    मेहंदीच्या कार्यक्रमात गायक प्रतीक कुहडचा परफॉर्मन्स

    रणबीर-आलियाने त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं. हा कार्यक्रम खास बनवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध गायक प्रतीक कुहडला बोलावलं होतं. प्रतीकच्या शानदार परफॉर्मन्सने या कार्यक्रमाला चार चाँद लावले.

  • 14 Apr 2022 08:47 AM (IST)

    रणबीरच्या बहिणीच्या हातावरील मेहंदी

    रणबीरची बहीण रिधिमा कपूरने इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या हातावरील मेहंदीचा फोटो पोस्ट केला आहे. रिधिमा दिल्लीला राहत असून मंगळवारीच ती भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाली.

  • 14 Apr 2022 07:43 AM (IST)

    अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छा

    बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील केसरिया हे गाणे शेअर करत अमिताभ बच्चन यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींनी लिहिले आहे की, ‘ईशा आणि शिव यांना आमच्या शुभेच्छा… कारण ते येत्या काही दिवसांत खूप खास प्रवास सुरू करणार आहेत. या उत्सवाची सुरुवात टीम ब्रह्मास्त्रने करूया.

    अमिताभ बच्चन यांच्याकडून शुभेच्छा

Published On - Apr 14,2022 7:32 AM

Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.