Ranbir-Alia Wedding LIVE updates: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत आहेत. 13 एप्रिलपासून रणबीर-आलियाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. आज (14 एप्रिल) रणबीर-आलियाचा लग्नसोहळा पार पडला. रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी मेहंदी आणि लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. रणबीर-आलिया गेल्या काही वर्षांपासून एकमेकांंना डेट करत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आता बॉलिवूडची ही लोकप्रिय जोडी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत असून या दोघांवर सध्या कलाविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आलिया भट्टने अखेर लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. पहा रणबीर-आलियाच्या लग्नातील खास क्षण
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नानंतर आता चाहत्यांना त्यांच्या फोटोंची प्रतीक्षा आहे. त्याआधी करीना कपूर खानने मुलगा जेहसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत गुलाबी रंगाच्या कुर्त्यामध्ये जेह खूपच गोड दिसत आहे.
आलियाचे वडील महेश भट्ट यांच्या हातावरील मेहंदीचा व्हिडीओ समोर आला आहे. महेश भट्ट यांनी त्यांच्या हातावर जावई रणबीरचं नाव लिहिलं आहे.
रणबीर-आलियाच्या लग्नानंतर बाहेर उपस्थित असलेल्या सर्व फोटोग्राफर्स आणि पापाराझींना लाडू देण्यात आले. यावेळी अल्पोपहाराचे पॅकेट्ससुद्धा पापाराझींमध्ये वाटण्यात आले.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबद्ध झाले आहेत. दोघांचं लग्न पार पडताच लग्नसोहळ्यातील फोटो समोर येऊ लागले आहेत. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये करण जोहर हा करीना कपूर आणि करिश्मा कपूरसोबत दिसत आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. लग्नाचे सर्व विधी पार पडल्याची माहिती समोर येत आहे.
“रणबीर-आलियाचं लग्न हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. कुटुंबीयांसाठी हा खूप मोठा दिवस आहे. आज चिंटूला (ऋषी कपूर) इथं असायला हवं होतं. त्याची आम्हाला रोज आठवण येते,” अशी प्रतिक्रिया रणधीर कपूर यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना दिली.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचा रिसेप्शन 16 आणि 17 एप्रिल रोजी होणार होता. मात्र, आता यात मोठा बदल करण्यात आला आहे. कोरिओग्राफर राजेंद्र सिंह उर्फ मास्टरजी यांनी सांगितलं की, हे जोडपे आता त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करणार नाही. लग्नात कपूर आणि भट्ट कुटुंबातील कोणताही सदस्य परफॉर्म करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
रणबीर कपूरच्या लग्नात आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका पोहोचले आहेत. रणबीरने आकाशला लग्नासाठी आमंत्रण दिल्याचं म्हटलं जात आहे. आकाश आजच परदेशात जाणार होता, पण त्याने मित्र रणबीरच्या लग्नासाठी त्याचा प्लॅन रद्द केला.
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आलिया भट्टला आपली मुलगी मानतो. लग्नात पोहोचताच करण पहिल्यांदा आलियाला भेटला. यावेळी आलियाचा मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसुद्धा करणसोबत होता. आलियाला भेटल्यानंतर दोघेही भावूक झाले.
वधूची आई सोनी राजदान लग्नाला पोहोचल्या आहेत. वरपक्षाकडून रणबीरची आई नीतू कपूर, बहीण रिधिमा कपूर सहानी आणि भाची समायरा सहानी यांचा पहिला फोटो समोर आला आहे.
आलियाचे वडील महेश भट्ट हे मुलगी पूजासोबत लग्नाला पोहोचले आहेत.
रणबीर-आलियाच्या लग्नातील करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लूक समोर आला आहे. करीनाने गुलाबी पेस्टल रंगाची साडी नेसली असून सैफने पांढऱ्या आणि गुलाबी रंगसंगतीचा कुर्ता-जॅकेट परिधान केला आहे. पहा त्यांचे फोटो-
रणबीर कपूर-आलिया भट्टच्या लग्नासाठी करीना कपूर आणि सैफ अली खानचा खास लूक#RanbirKapoorAliaBhattWedding #RanbirAlia #RanbirKapoor #AliaBhatt #KareenaKapoorKhan #SaifAliKhan pic.twitter.com/eUCMUIEbVP
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2022
रणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे. हे दोघं थोड्याच वेळात सात फेरे घेणार आहेत. लग्नाचे विधी सुरू होण्यापूर्वी वधूची आई सोनी राजदान आणि बहीण शाहिन यांचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेते शक्ती कपूर यांनी रणबीर-आलियाच्या विवाहप्रसंगी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आज ऋषी कपूर असते तर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नसता. सर्वांत खूश ते असते”, असं ते म्हणाले.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नासाठी ढोलिडा, क्यूटी पाय, तेनू लेके में जा वांगा आणि मेहंदी है या गाण्यांवर परफॉर्मन्स तयार करण्यात आले आहेत. या लग्नात नीतू कपूर, करीना कपूर, रिद्धिमा कपूर सहानी यांच्यासह इतर कलाकार परफॉर्म करणार आहेत. अवघ्या 4 ते 5 दिवसात सर्वांनी डान्सची तयारी केली आहे. नीतू कपूर यांच्या घरी रिहर्सल्स करण्यात आले.
रिधिमा कपूरने आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नातील तिचा लूक शेअर केला आहे. पांढऱ्या आणि काळ्या रंगसंगतीत चमचमणारी ही साडी डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केली आहे. त्याची किंमत सुमारे 1 लाख 55 हजार रुपये इतकी आहे.
आलियाशी लग्न केल्यानंतर रणबीर कपूर सोशल मीडियावर पदार्पण करणार असल्याचं कळतंय. सोशल मीडियावर चाहत्यांसाठी व्हिडीओ मेसेज पोस्ट करण्याचा सल्ला आलियाने रणबीरला दिला आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाआधी संगीत सेरेमनीचा फोटो समोर आला आहे. नीतू कपूर यांनी नृत्यदिग्दर्शक मास्टरजींसोबत डान्स रिहर्सलचा फोटो शेअर केला आहे.
रणबीरच्या वरातीसाठी परवानगी न मिळाल्याने दुपारी दोन ते पाचच्या दरम्यान सप्तपदी पार पडणार आहेत. संध्याकाळी 5 नंतर आलिया-रणबीरच्या लग्नाचे फोटो माध्यमांसमोर येणार असल्याचं कळतंय.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा हळदी सोहळा पार पडला. या सोहळ्यात नीतू कपूर, शाहीन भट्ट, सोनी राजदान आणि रिद्धिमा कपूर सहानी उपस्थित होत्या.
आलिया भट्टची खास मैत्रीण अनुष्का रंजन लग्नात हजर राहणार आहे. तिने इन्स्टा स्टोरीमध्ये स्वत:चा लूक पोस्ट केला आहे.
मुलाच्या लग्नासाठी नीतू कपूर अत्यंत आनंदी आहेत. बुधवारी पार पडलेल्या मेहंदीच्या कार्यक्रमात त्यांनी हातावर मेहंदी काढली आणि त्यात ऋषी असं नावदेखील लिहायला सांगितलं. या मेहंदीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
रणबीरच्या वास्तू या निवासस्थानी लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. लग्नापूर्वीच्या काही विधींसाठी नीतू आणि रिधिमा कपूर यांनी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. नीतू कपूर यांच्या हातावर रंगलेली मेहंदीसुद्धा या फोटोत पहायला मिळतेय.
गुरुवारी सकाळी महेश भट्ट यांना जुहूमधल्या त्यांच्या घराजवळ कॅज्युअल लूकमध्ये पाहिलं गेलं. यावेळी त्यांनी पापाराझींना हात दाखवला.
रणबीरची बहीण रिधिमा कपूर सहानी आणि चुलत बहिणी करिश्मा, करीना कपूर यांनी मेहंदीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर करिश्मा आणि रिधिमाने इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केला. पहा फोटो
रणबीर कपूरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी काल (13 एप्रिल) मेहंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसह विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिधिमा कपूर सहानी या ‘वास्तू’ बंगल्यावर पोहोचल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे.
आलियाची आई सोनी राजदान या मोठी मुलगी शाहिनसोबत विवाहस्थळी पोहोचल्या. रणबीरच्या ‘वास्तू’ बंगल्यावरच लग्न पार पडणार आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाचे विधी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. रणबीरच्या ‘वास्तू’ या बंगल्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या खास दिवसासाठी आलियाचा मेकअप सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट माईकी करणार असल्याचं कळतंय.
रणबीर-आलियाने त्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित केलं होतं. हा कार्यक्रम खास बनवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध गायक प्रतीक कुहडला बोलावलं होतं. प्रतीकच्या शानदार परफॉर्मन्सने या कार्यक्रमाला चार चाँद लावले.
रणबीरची बहीण रिधिमा कपूरने इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या हातावरील मेहंदीचा फोटो पोस्ट केला आहे. रिधिमा दिल्लीला राहत असून मंगळवारीच ती भावाच्या लग्नासाठी मुंबईत दाखल झाली.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील केसरिया हे गाणे शेअर करत अमिताभ बच्चन यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बींनी लिहिले आहे की, ‘ईशा आणि शिव यांना आमच्या शुभेच्छा… कारण ते येत्या काही दिवसांत खूप खास प्रवास सुरू करणार आहेत. या उत्सवाची सुरुवात टीम ब्रह्मास्त्रने करूया.
T 4250 – Love is the light .. To new beginnings and more! ❤️❤️
BRAHMĀSTRA Part One: Shiva |
Kesariya TeaserYouTube Linkhttps://t.co/E54itd5n5G pic.twitter.com/iE2s5Xg6XD
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 13, 2022