Ranbir-Alia Wedding Function LIVE updates: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा होत आहेत. आजपासून (13 एप्रिल) रणबीर-आलियाच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी हे कार्यक्रम होत असून विविध सेलिब्रिटी आणि नातेवाईकांनी त्याला हजेरी लावली आहे. 13 ते 17 एप्रिलदरम्यान हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र लग्नाची निश्चित तारीख अद्याप रणबीर-आलियाकडून जाहीर करण्यात आली नाही. या दोघांच्या कुटुंबीयांनी त्याविषयी माध्यमांसमोर बोलणं टाळलं असलं तरी लग्नाच्या तयारीचे प्रत्येक डिटेल्स पापाराझींकडून शूट केले जात आहेत. रणबीर आणि आलियाच्या घराला रोषणाई करण्यात आली आहे. बॉलिवूड कलाकारांकडून या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बॉलिवूडमधील चर्चेतील कपल असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भटचं लग्न उद्याच होणार आहे. रणबीरची वरात उद्याच निघणार असल्याचं आई नितू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर यांनी जाहीर केलंय.
आपल्या विवाहानंतर रणबीर कपूर सोशल मीडियावर येणार असल्याची चर्चा आतापासूनच होऊ लागली आहे. आलियाने रणबीरला त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक वैयक्तिक व्हिडीओ मेसेज करत ती यासाठी तयार झाली आहे. तर या दोघांच्या लग्नातील मेहंदी समारंभाचा एक खास व्हिडीओ आहे तो आता शेअर करण्यासही सांगण्यात आला आहे.
रेमो डिसूझाने रणबीर आणि आलिया यांच्या केमिस्ट्रीचे कौतूक करत त्यांनी त्यांच्या लग्नापूर्वी अयान मुखर्जीने रिलीज केलेल्या ब्रह्मास्त्रमधील केसरिया गाण्यातील त्यांच्या केमिस्ट्रीबद्दलच्या त्यांनी आठवण सांगितली आहे. रणबीर आणि आलियाची पडद्यावरची आणि पडद्याबाहेरचीही त्यांची केमिस्ट्री उत्तम असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मेहंदी कार्यक्रमासाठी ढोलवादक आणि गायकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला फक्त कुटुंबातील सदस्य, करण जोहर, अयान मुखर्जी, मैत्रीण आरती शेट्टी उपस्थित होते. मेहंदी सोहळ्यासाठी खास लाल आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. या मेहंदी सोहळ्यात करण जोहर होस्टची भूमिका पार पाडत होता.
43 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1979 रोजी रणबीरचे आईवडील नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांचा साखरपुडा झाला होता. ही आठवण नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली.
लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे आणि लग्नाचे फोटो लीक होऊ नये यासाठी सुरक्षारक्षकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्यांच्या मोबाइल फोनच्या कॅमेरावर स्टिकर लावले जात आहेत.
रणबीर आणि आलियाचा खास मित्र आणि त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी कार्यक्रमाला पोहोचला आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर-आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले.
रणबीरच्या लग्नासाठी त्याची बहीण रिधिमा सहानी मंगळवारी दिल्लीहून मुंबईला आली. मुलगी रिधिमा आणि नातसह नीतू कपूर या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाल्या.
रणबीर-आलियाला लग्नाची भेट देण्यासाठी सूरतमधल्या एका सोने व्यापाऱ्याने चक्क सोन्याचा बुके पाठवला आहे. हा बुके 100 टक्के सोन्याचा असल्याचा दावा तो करत आहे.
पिवळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने ग्लॅमरस एण्ट्री केली आहे. करणनेच आलियाला ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं.
आलिया आणि रणबीरने मुंबईतच आर. के. हाऊसमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या घरीच मेहंदी आणि हळदीचे कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमासाठी आलियाचे वडील महेश भट्ट आणि बहीण पूजा भट्ट पोहोचले आहेत.
रणबीरच्या बहिणी करिश्मा आणि करीना कपूर मेहंदीच्या कार्यक्रमासाठी पोहोचले आहेत. यावेळी करीनाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा तर करिश्माने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.