Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाचा सर्वांत हटके मेन्यू

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात (Ranbir Alia Wedding) अडकले आहेत. आलिया आता कपूरांची सून झाली आहे. मुंबईतल्या 'वास्तू' या निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला.

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाचा सर्वांत हटके मेन्यू
Ranbir Kapoor, Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 5:36 PM

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात (Ranbir Alia Wedding) अडकले आहेत. आलिया आता कपूरांची सून झाली आहे. मुंबईतल्या ‘वास्तू’ या निवासस्थानी हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मोजक्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं. कपूर आणि भट्ट कुटुंबातील मोजकेच जण लग्नाला उपस्थित होते. लग्नाला उपस्थित असलेल्या 50 जणांपैकी 20 जण हे रणबीर-आलियाचे सर्वांत खास आणि जवळचे होते. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक लहानसहान बाबींची माहिती समोर येत आहे. लग्नातील मेन्यू (Wedding Menu) हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या मेन्यूमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत, याबाबतची माहिती समोर आली आहे. या मेन्यूमध्ये खास आलिया आणि रणबीरसाठी (Ranbir Alia) त्यांच्या डाएटनुसार पदार्थ ठेवण्यात आले आहेत.

तंदुरी चिकन, दाल मखनी यांसारखे पदार्थ पाहुण्यांसाठी असून मीडिया रिपोर्ट्सनुसार आलियासाठी खास वेगन बर्गर बनवण्यात आला आहे. आलिया आणि तिची खास मैत्रीण अनुष्का रंजन या दोघींना वेगन बर्गर खूप आवडतं. त्यानुसार वेगन बर्गर मेन्यूमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. भारतीय पदार्थांशिवाय काही फ्जुयन फूड आणि सुशीसुद्धा सर्व्ह करण्यात येणार आहेत. रणबीरला सुशी खूप आवडत असल्याने मेन्यूमध्ये सुशी काऊंटर खास समाविष्ट करण्यात आला आहे.

इन्स्टा पोस्ट-

2018 मध्ये या दोघांनी अभिनेत्री सोनम कपूरच्या रिसेप्शनला एकत्र हजेरी लावली होती. 2017 मध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हळूहळू आलिया-रणबीरच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असताना आलियाने त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा भेट दिली. त्यावेळी आलियाने तिच्या नवीन वर्षाची सुरुवातदेखील कपूर कुटुंबीयांसोबत केली होती. तेव्हापासून रणबीर-आलियाला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या मेहंदीनंतर करिश्माने पोस्ट केला पहिला फोटो

Kajal Aggarwal: ‘आपलं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे, पण..’; पतीसाठी काजल अग्रवालची भावनिक पोस्ट

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.