Ranbir Alia Wedding: ‘तुझा छोटा हात धरण्यापासून ते आता..’; रणबीर-आलियाच्या बॉडीगार्ड्सची पोस्ट चर्चेत

या दोघांच्या बॉडीगार्ड्सनी (bodyguards) लिहिलेल्या पोस्टने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. आलियाचा बॉडीगार्ड युसूफ इब्राहिम आणि रणबीरचा बॉडीगार्ड सुनील तळेकर यांनी दोघांसाठी पोस्ट लिहिली आहे.

Ranbir Alia Wedding: 'तुझा छोटा हात धरण्यापासून ते आता..'; रणबीर-आलियाच्या बॉडीगार्ड्सची पोस्ट चर्चेत
Ranbir Kapoor Alia Bhatts bodyguardsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:49 AM

सोशल मीडियावर स्क्रोल केल्यावर सध्या अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाचेच फोटो पहायला मिळत आहेत. रणबीर-आलियाने 14 एप्रिल रोजी ‘वास्तू’ या बंगल्यात लग्नगाठ बांधली. लग्नाला त्यांचे मोजकेच जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या दोघांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी सोशल मीडियावर रणबीर-आलियासाठी पोस्ट लिहिली आहे. त्यातच या दोघांच्या बॉडीगार्ड्सनी (bodyguards) लिहिलेल्या पोस्टने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. आलियाचा बॉडीगार्ड युसूफ इब्राहिम आणि रणबीरचा बॉडीगार्ड सुनील तळेकर यांनी दोघांसाठी पोस्ट लिहिली आहे.

रणबीर आणि आलियासोबतचा फोटो पोस्ट करत युसूफ यांनी लिहिलं, ‘मुबारक मिस्टर अँड मिसेस कपूर’, तर दुसरीकडे सुनील तळेकर यांनीसुद्धा दोघांसोबतचा फोटो पोस्ट केला. ‘तुझा छोटा हात धरण्यापासून ते आता तुला वधूच्या रूपात पाहण्यापर्यंत.. मी हे म्हणू शकतो की आज माझं हृदय आनंदाने भरलंय’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

बॉडीगार्ड युसूफ यांची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Yusuf Ibrahim (@yusuf_911)

बॉडीगार्ड सुनील तळेकर यांची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by sunil (@suniltalekar1977)

आलियाची आई सोनी राजदान यांनीसुद्धा सोशल मीडियावर लेकीसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘ते म्हणतात की जेव्हा तुम्हाला मुलगा (जावई) भेटतो तेव्हा तुम्ही मुलीला गमावता. मी म्हणेन की आम्हाला अत्यंत चांगला मुलगा आणि त्यासोबत एक प्रेमळ कुटुंब भेटलंय. माझी लाडकी सुंदर लेक नेहमीच इथे आमच्यासोबत असेल. रणबीर आणि आलिया.. तुम्हाला तुमच्या या प्रवासात खूप प्रेम आणि आनंद मिळो. तुमची प्रेमळ.. माँ’, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

गेल्या महिन्याभरापासून कलाविश्वात आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा रंगत होती. अखेर गुरुवारी (14 एप्रिल) संध्याकाळी हे दोघं लग्नबंधनात अडकले. रणबीर कपूरच्या मुंबईतील ‘वास्तू’ या बंगल्यात हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी कपूर आणि भट्ट कुटुंबातील मोजके पाहुणे आणि बॉलिवूडमधील काही तारे-तारका उपस्थित होते. बुधवारी 13 एप्रिल रोजी रणबीर-आलियाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

हेही वाचा:

Chirag Patil: सेटवरच्या जेवणाविषयी चिरागने लढवली शक्कल; पाच दिवसांत बदलल्या क्रू मेंबर्सच्या सवयी

Ranbir Alia Wedding: हे असं लग्न लावणं चेष्टा नाय, मंडळी! धाडस लागतं.. धाडस

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.