Brahmastra: ‘या’ 6 कारणांमुळे रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ची होऊ शकते मोठी ओपनिंग
बॉलिवूडमधला हा बिग बजेट चित्रपट आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली सुरू आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या 8 वर्षांपासून दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि त्याची टीम या चित्रपटावर काम करत आहे. बॉलिवूडमधला हा बिग बजेट चित्रपट आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली सुरू आहे. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या वीकेंडची ओपनिंग खूप चांगली होऊ शकते असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. त्यामागची सहा कारणं जाणून घेऊयात..
-
- ब्रह्मास्त्रमध्ये एक नवीन जोडी पहायला मिळणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करत आहेत. लग्नानंतर ही जोडी ऑनस्क्रीनसुद्धा एकत्र झळकणार आहे.
- या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम रचला आहे. आयमॅक्स 3डी स्क्रीन्सवर चित्रपटाचे 7,750 तिकिट्स विकले गेले आहेत. तर PVR सिनेमाजचे पहिल्या वीकेंडचे तब्बल एक लाख तिकिटं विकली गेली आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशाची 80 टक्के बुकिंग झाली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाची कमाई जोरदार होऊ शकते.
- एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याला पायरसीचा मोठा फटका बसायचा धोका असतो. मात्र ब्रह्मास्त्रने यावरही उपाय शोधला आहे. दिल्ली हायकोर्टाने अशा 18 साइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या साइट्सवर ब्रह्मास्त्रची पायरेटेड कॉपी अपलोड झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- ब्रह्मास्त्रची आणखी एक सकारात्मक बाजू म्हणजे ऑस्कर पुरस्कार विजेत्या कंपनीने या चित्रपटातील व्हीएफएक्सचं काम केलंय. DNEG या कंपनीने ब्रह्मास्त्रच्या VFX ची जबाबदारी उचलली आहे. ‘ड्युन’ या चित्रपटाच्या व्हिएफएक्सचं काम या कंपनीने केलं होतं. ड्युनने व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी ऑस्करचा पुरस्कार जिंकला होता.
- रणबीर-आलियाशिवाय ब्रह्मास्त्र या चित्रपटात इतरही मोठे कलाकार आहेत. अमिताभ बच्चन, नागार्जुन या दिग्गज कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
- बिग बजेट, दमदार कलाकार आणि तगडं व्हिएफएक्स या ब्रह्मास्त्रच्या जमेच्या बाजू आहेत. चित्रपटाची कथा दमदार असली तर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दणक्यात कमाई करू शकेल.