Ranbir Alia Net Worth: साधेपणानं लग्न पण रणबीर-आलियाच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील!

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी 14 एप्रिल रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या 'वास्तू' बंगल्यावर लग्नगाठ बांधली. रणबीर-आलियाने साधेपणानं केलेल्या लग्नाची कलाविश्वात खूप चर्चा झाली. रणबीर सध्या बॉलिवूडमध्ये मोजकेच चित्रपट करत असला तरी हे दोघं यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जातात.

Ranbir Alia Net Worth: साधेपणानं लग्न पण रणबीर-आलियाच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील!
Ranbir Alia net worthImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 3:37 PM

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी 14 एप्रिल रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या ‘वास्तू’ बंगल्यावर लग्नगाठ बांधली. रणबीर-आलियाने साधेपणानं केलेल्या लग्नाची कलाविश्वात खूप चर्चा झाली. रणबीर सध्या बॉलिवूडमध्ये मोजकेच चित्रपट करत असला तरी हे दोघं यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जातात. या दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. 100 कोटी क्लबचे चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंड, इतर गुंतवणूक हे सर्व मिळून रणबीर-आलियाची एकूण संपत्ती ही जवळपास 700 कोटींहून अधिक आहे. यात आलियाचा वाटा रणबीरपेक्षा अधिक आहे. 2021 मध्ये आलियाची संपत्ती ही जवळपास 517 कोटी रुपये असल्याचं सांगितलं गेलं. ‘डफ अँड फेल्प्स’ने दिलेल्या वृत्तानुसार त्यावर्षी रणबीरची संपत्ती ही 203 कोटी रुपये इतकी होती. या दोघांची संपत्ती मिळून 720 कोटींच्या घरात आहे. (Ranbir Alia Net Worth)

आलियाची संपत्ती-

इंडस्ट्रीतील सूत्रांच्या मते, आलिया सध्या एका चित्रपटासाठी जवळपास 15 ते 18 कोटी रुपयांचं मानधन घेते. फायनान्शियल कन्सल्टन्सी फर्म ‘डफ आणि फेल्प्स’ने तिला 2021 मध्ये भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण सेलिब्रिटींच्या यादीत सहावं स्थान दिलं. या यादीत तिने सलमान खानलाही मागे टाकलं होतं. आलिया भट्ट ही तरुणाईत लोकप्रिय असल्याने तिला असंख्य जाहिरातींच्या ऑफर्स येतात. क्वालिटी वॉल्स कॉर्नेटो, लेज, फ्रुटी, ड्युरोफ्लेक्स, मान्यवर-मोहे, कॅडबरी, फ्लिपकार्ट यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींची ती ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या जाहिरातीच्या शूटिंगच्या एक दिवसासाठी ती जवळपास 2 कोटी कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातं.

मुंबईतील वांद्रे परिसरात आलियाचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 32 कोटी रुपये आहे. इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स या तिच्या नव्या प्रॉडक्शन कंपनीच्या जागेची किंमत ही सुमारे दोन कोटी इतकी आहे. आलियाने लंडनमध्येही घर विकत घेतलं आहे. लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, BMW 7 series या दीड ते दोन कोटींपर्यंतच्या महागड्या गाड्यादेखील तिच्याकडे आहेत.

पहा लग्नाचे फोटो-

रणबीरची संपत्ती-

दुसरीकडे रणबीर कपूर एका चित्रपटासाठी जवळपास 50 कोटी रुपये मानधन घेत असल्याचं म्हटलं जातं. ही किंमत आलियाच्या मानधनापेक्षा तीन पटींनी अधिक आहे. मात्र रणबीर फारच मोजके चित्रपट करतो. त्याचा ‘संजू’ हा चित्रपट चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. रणबीरचे सोशल मीडिया अकाऊंट नसले तरी त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. ओप्पो, टाटा एआयजी, कोका कोला, ओरिओ अशा ब्रँड्सच्या जाहिराती तो करतो. या ब्रँड शूटसाठी तो सहा कोटी रुपये इतकं मानधन घेतो.

पाली हिल परिसरातील रणबीरच्या ‘वास्तू’ या बंगल्याची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे. म्युझिक स्ट्रिमिंग सर्व्हिस सावनमध्येही (Saavn) त्याने गुंतवणूक केली आहे. आलियाप्रमाणेच रणबीरकडेही आलिशान, महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. ज्यामध्ये लँड रोव्हर रेंज रोव्हर वोग, मर्सिडिज बेंझG 63 AMG आणि Audi R8 यांचा समावेश आहे.

पहा मेहंदीचे फोटो-

रणबीरच्या तुलनेत आलियाची संपत्ती अधिक जरी असली तरी दोघांची लोकप्रियता ही समान असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा सांगतात. “आलियाने रणबीरपेक्षा जास्त चित्रपट केले आहेत, म्हणून ती अधिक यशस्वी आहे. पण रणबीरसुद्धा सुपरस्टार आहे. दोघंसुद्धा मोठ्या बॅनरअंतर्गत चित्रपट करतात. ब्रह्मास्त्र हा बॉलिवूडमधील सर्वांत महागडा चित्रपट आहे”, असं ते म्हणाले. या चित्रपटातून रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र काम करणार आहे. याआधी दोघांनी जाहिरातींमध्ये एकत्र काम केलं होतं.

हेही वाचा:

Sanjay Dutt: हिंदी चित्रपटांचं कुठे चुकतंय? RRR, KGF2च्या यशानंतर संजय दत्तने सांगितलं कारण

“हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच..”; 11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश बांदेकरांचं सडेतोड उत्तर

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.