Ranbir Kapoor: आलिया जवळ नसेल तर रणबीर करत नाही ‘ही’ कामं; मुलाखतीत खुलासा

नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान रणबीरने आलिया आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं की, तो पूर्णपणे आलियावर अवलंबून आहे.

Ranbir Kapoor: आलिया जवळ नसेल तर रणबीर करत नाही 'ही' कामं; मुलाखतीत खुलासा
Ranbir and AliaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 7:40 PM

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ब्रह्मास्त्रच्या निमित्ताने दोघं पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आहेत. विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यातील या दोघांची प्रेमकहाणी याच चित्रपटाच्या सेटपासून सुरू झाली होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी यावर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधल्या सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. या दोघांमध्ये अप्रतिम केमिस्ट्री आहे. इतकंच नाही तर रणबीर कपूरने असंही मान्य केलं आहे की तो त्याच्या खऱ्या आयुष्यात पूर्णपणे आलियावर अवलंबून आहे.

रणबीर आणि आलियाने मिळून ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. यादरम्यान त्यांच्यातील केमिस्ट्री आणि जवळीक पाहून चाहते दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान रणबीरने आलिया आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं की, तो पूर्णपणे आलियावर अवलंबून आहे. आलिया नेहमीच त्याच्याभोवती असते आणि हे आता त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं झालं आहे, असंही तो म्हणाला.

आलियाने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात ईशाची भूमिका साकारली आहे, तर रणबीर शिवाच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील एका दृश्यात ईशा तिच्याशिवाय शिव अपूर्ण असल्याचं सांगताना दिसत आहे. या डायलॉगवरून रणबीरला प्रश्न विचारण्यात आला की, खऱ्या आयुष्यातही दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत का? यावर रणबीरने कबूल केलं की तो आलियावर खूप अवलंबून आहे. “मी खूप स्वतंत्र आणि अलिप्त आहे याचा मला खूप आनंद वाटतो. पण प्रत्यक्षात मी आलियावर खूप अवलंबून आहे. आलिया कुठे आहे हे मला कळेपर्यंत मी जेवत नाही, बाथरूमलाही जात नाही. माझ्यासाठी आलियाने माझ्या अवतीभोवती असणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही कदाचित एकमेकांशी बोलतही नसू, पण तरी ती माझ्या शेजारी बसलेली असावी,” असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

रणबीरच्या या गोष्टी आलियानेही मान्य केल्या. “रणबीर माझ्याशिवाय काही करत नाही हे खरं आहे. मी आजूबाजूला नसले तर तो अखेर सगळं सोडून निघून जातो,” असं आलियाने सांगितलं. रणबीर आणि आलियाने याचवर्षी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. हे दोघं लवकरच आई-बाबा होणार आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.