मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याच्या आगामी तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीर कपूर सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामध्ये रणबीर कपूर याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रणबीर कपूर हे स्क्रीन शेअर करणार आहेत. यांची जोडी आता बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर हा चंडीगढमध्ये पोहचला होता. त्यावेळी रणबीर कपूर याने चक्क पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर रणबीर कपूर यांच्यावर मोठी टिका करण्यात आली.
नुकताच तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे प्रमोशन करताना रणबीर कपूर याला मुलगी राहा हिच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रणबीर कपूर म्हणाला की, तो त्याच्या मुलीवरील प्रेमाबद्दल बोलायला घाबरतो…6 नोव्हेंबर 2022 रोजी आलिया भट्ट हिने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. एप्रिलमध्ये आलिया आणि रणबीर हे लग्नबंधणात अडकले आहेत.
आलिया भट्ट हिच्या मुलीची झलक पाहण्यास चाहते आतुर आहेत. मात्र, अजूनही चाहत्यांना आलिया भट्ट हिच्या मुलीची एक झलक बघायला मिळाली नाहीये. रणबीर कपूर म्हणाला की, आता काहीही महत्त्वाचे नाही आणि सर्वकाही महत्त्वाचे आहे, हे सर्व एकाच वेळी घडत आहे. मला याबद्दल बोलायलाही भीती वाटते. कारण आत खूप प्रेम आहे. त्यामुळे एक मनात विचित्र भीती आहे. ही भीती कधी दूर होईल का?’
पुढे रणबीर कपूर म्हणाला, पण मला एक समजले की ही एक गोष्ट आहे जी नेहमीच माझ्यासोबत राहील, मरेपर्यंत माझ्यासोबत राहील…एप्रिलमध्ये आलिया आणि रणबीर यांनी अचानकपणे लग्नगाठ बांधत सर्वांना मोठा धक्का दिला होता. आलिया भट्ट हिने मुलीच्या नावाचा अर्थ सांगत एक पोस्टही सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी शेअर केली होती.
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार करताना रणबीर कपूर दिसत आहे. रणबीर कपूर याने पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर टिका झाली. त्यानंतर लगेचच रणबीर कपूर याने मोठा यू टर्न घेत आपल्या देशापेक्षा कोणतीही कला मोठी नक्कीच नाहीये, असे म्हटले होते.
पहिली प्राथमिकता नेहमीच तुमचा देश असायला हवा, असेही रणबीर कपूर म्हणाला होता. रणबीर कपूर याने थेट पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मात्र, त्यानंतर आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे देखील रणबीर कपूर म्हणाला होता.