Ranbir Kapoor | बॉयकॉट ट्रेंड हा फक्त मुर्खपणा, रणबीर कपूर भडकला, थेट म्हणाला

गेल्या काही दिवसांपासून सतत बॉयकॉट ट्रेंडचा फटका हा बाॅलिवूड चित्रपटांना बसताना दिसत आहे. आता यावर अभिनेता रणबीर कपूर याने भाष्य केले आहे. रणबीर कपूर हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

Ranbir Kapoor | बॉयकॉट ट्रेंड हा फक्त मुर्खपणा, रणबीर कपूर भडकला, थेट म्हणाला
Ranbir kapoor
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 6:00 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा तू झूठी मैं मक्कार या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर हा धमाकेदार पध्दतीने चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. रणबीर कपूर याच्यासह निर्मात्यांना देखील या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. मुळात म्हणजे पठाण चित्रपट (Movie) हिट झाल्यानंतर अक्षय कुमार याचा सेल्फी आणि कार्तिक आर्यन याचा शहजादा हे दोन्ही चित्रपट फ्लाॅप गेले आहेत. पठाण चित्रपटानंतर बाॅलिवूडला परत एकदा चांगले दिवस आल्याचे बोलले जात होते. मात्र, शहजादा आणि सेल्फी फ्लाॅप गेल्याने चित्रपट निर्मात्यांनी चांगलाच धसका घेतलाय.

मुळात म्हणजे कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत. याला फक्त दोन चित्रपट अपवाद ठरले. दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट देखील रिलीजसाठी तयार आहे.

बॉयकॉट बाॅलिवूड ट्रेंडचा चित्रपटांना फटका बसल असल्याचे सांगण्यात येतय. आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमार याचा सम्राट पृथ्वीराज रिलीज होण्याच्या अगोदर या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात होती आणि याचाच फटका चित्रपटाला बसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

आता बॉयकॉट बाॅलिवूड ट्रेंडवर रणबीर कपूर याने मोठे भाष्य केले आहे. इतकेच नाही तर त्याने हा ट्रेंड चालवणाऱ्यांना खडेबोलही सुनावले आहेत. नुकताच बॉयकॉट बाॅलिवूड ट्रेंडबद्दल रणबीर कपूर याला विचारण्यात आले होते. यावेळी रणबीर कपूर म्हणाला की, मुळात म्हणजे मला यावर काही बोलायचेच नाहीये…

बॉयकॉट बाॅलिवूड यासर्व गोष्टी कोरोनानंतर सुरू झाल्या आहेत. मला वाटते की, यासर्व गोष्टी मूर्खपणा आहेत. चित्रपट हे फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार केले जातात. आम्ही काय जगाला वाचवत वगैरे अजिबात नाहीत. आम्ही फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपट तयार करतो.

लोक आपल्या समस्या विसरून चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतात आणि चांगला वेळ घालवतात. मला हे बॉयकॉटबद्दल कळत नाही. कारण इंथे आम्ही कोणीही चुकीचे काही करत नाहीत. प्रत्येक व्यक्ती आपले बेस्ट देण्याचाच प्रयत्न करत असतो. आता यामुळेच रणबीर कपूर हा चर्चेत आलाय.

रणबीर कपूर याच्यासोबत तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच चित्रपटामध्ये रणबीर आणि श्रद्धा कपूरसोबत काम करणार आहेत. आता चित्रपटामध्ये ही जोडी काय धमाल करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वी आता रणबीर कपूर हा चर्चेत आलाय.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.