Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brahmastra: ‘ब्रह्मास्त्र’ ठरणार ब्लॉकबस्टर?, ॲडव्हान्स बुकिंगचा थक्क करणारा आकडा

ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर आणि आलियासोबतच अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय शाहरुख खानसुद्धा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

Brahmastra: 'ब्रह्मास्त्र' ठरणार ब्लॉकबस्टर?, ॲडव्हान्स बुकिंगचा थक्क करणारा आकडा
BrahmastraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 1:41 PM

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हीच उत्सुकता ॲडव्हान्स बुकिंगमध्येही दिसून येत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंडची तब्बल एक लाख तिकिटं विकली गेली आहेत. मल्टिप्लेक्स चेन PVR सिनेमाजचा हा आकडा आहे. ब्रह्मास्त्रने ॲडव्हान्स बुकिंगचा हा विक्रमच रचला आहे. पीव्हीआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबद्दलची माहिती देण्यात आली.

‘ब्रह्मास्त्रच्या पहिल्या वीकेंडची तब्बल एक लाख तिकिटं PVR कडे बुक झाली आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं. भारतीय अस्त्रांवर आधारित तीन भागांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचाच पहिला भाग ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ हा आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. ब्रह्मास्त्र या फ्लॉप चित्रपटांच्या मालिकेला पूर्णविराम देऊ शकेल, असा विश्वास अनेकांकडून व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर आणि आलियासोबतच अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय शाहरुख खानसुद्धा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. 2014 मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तब्बल आठ वर्षांनंतर हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे.

दिग्दर्शक म्हणून अयान मुखर्जीचा हा तिसरा चित्रपट आहे. विशेष म्हणजे या तिन्ही चित्रपटात रणबीरनेच मुख्य भूमिका साकारली आहे. 2009 मध्ये त्याने ‘वेक अप सिद’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये रणबीरसोबत कोंकना सेन शर्माने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्याने ‘ये जवानी है दिवानी’ हा सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात रणबीर-दीपिका पदुकोणची जोडी पहायला मिळाली.

खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.