Shamshera | रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई इतके कोटी, तरण आदर्श यांनी चित्रपटाला 1.5 स्टार दिले

'शमशेरा' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ 10.25 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे आणि सूत्रांचे म्हणणे आहे की चित्रपटामागील निर्मिती कंपनीने जास्त पैसे खर्च केले आहेत.

Shamshera | रणबीर कपूरच्या 'शमशेरा' चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई इतके कोटी, तरण आदर्श यांनी चित्रपटाला 1.5 स्टार दिले
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 9:04 AM

मुंबई : रणबीर कपूरच्या (Ranbir kapoor) ‘शमशेरा’ ने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केली नाहीयं. या चित्रपटात सर्वच कलाकारांनी जबरदस्त काम केले असले तरी एवढी मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट काही विशेष करू शकलेला नाही. रणबीर कपूरच्या 2018 मध्ये आलेल्या ‘संजू’ चित्रपटाच्या (Movie) कमाईच्या तुलनेत हे काहीच नाही. ‘शमशेरा’च्या (Shamshera) पहिल्या दिवसाची कमाई दहा कोटीच आहे. यापेक्षा कमी कमाई करणारा चित्रपट फक्त ‘बर्फी’ आहे. यशराज फिल्म्सचे मागील तीन ते चार चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. ते फारशी कमाई करू शकलेली नाही. या चित्रपटांमध्ये ‘जयेशभाई जोरदार’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि आता नुकताच प्रदर्शित झालेला ‘शमशेरा’ हा चित्रपटही या यादीत सामील होताना दिसत आहे.

रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ 10.25 कोटींची कमाई

‘शमशेरा’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ 10.25 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे आणि सूत्रांचे म्हणणे आहे की चित्रपटामागील निर्मिती कंपनीने जास्त पैसे खर्च केले आहेत. खरंतर हा चित्रपट कोरोना महामारीनंतर सर्वाधिक स्क्रीनवर प्रदर्शित होणारा चित्रपट आहे. हा चित्रपट भारतात 4350 आणि परदेशात 1200 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. मात्र, चित्रपटाच्या तिकिटाचे दरही खूपच कमी ठेवण्यात आले आहेत, असे असूनही पहिल्या दिवशी चित्रपटाच्या तिकीटांची फारशी विक्री होऊ शकली नाही.

हे सुद्धा वाचा

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाला 1.5 स्टार दिले

रणबीर कपूरचा चित्रपट ‘शमशेरा’ देखील कार्तिक आर्यनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया 2’ च्या मागे पडला आहे. ‘भूल भुलैया 2’ ने पहिल्या दिवशी 14.11 कोटींची कमाई केली होती. त्याचवेळी, ‘शमशेरा’ची पहिल्या दिवसाची कमाई याआधीच्या ‘बच्चन पांडे’ 13.25 कोटी आणि ‘सम्राट पृथ्वीराज’ 10.70 कोटी या दोन मोठ्या फ्लॉप चित्रपटांपेक्षा कमी आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाला 1.5 स्टार दिले आहेत. यावेळी तरण आदर्श यांनी एक पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.