रणबीर कपूर याचा चित्रपट ठरला शाहरुख खान याच्या पठाणपेक्षा वरचढ, पहिल्याच दिवशी धूळ चारली

रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाचा ओपनिंग डेही चांगला गेलाय. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने पठाण चित्रपटाचा एक रेकाॅर्ड तोडला आहे.

रणबीर कपूर याचा चित्रपट ठरला शाहरुख खान याच्या पठाणपेक्षा वरचढ, पहिल्याच दिवशी धूळ चारली
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 9:58 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) हिट ठरला. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे ज्यावेळी बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात होते. त्याचवेळी सर्वाधिक कमाई करणारा शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला आणि तेंव्हापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादामध्ये सापडला. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला. मात्र, प्रत्यक्षात या वादाचा फायदा हा पठाण चित्रपटाला झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण चित्रपट ठरला आहे.

पठाण चित्रपटानंतर कार्तिक आर्यन याचा शहजादा आणि अक्षय कुमार याचा सेल्फी हे चित्रपट रिलीज झाले. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हे चित्रपट फ्लाॅप गेले. नुकताच 8 मार्च रोजी बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात श्रद्धा कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे.

पहिल्यादाच दिवशी तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचा रेकाॅर्ड तोडला आहे. म्हणजेच शाहरुख खान याच्या चित्रपटापेक्षाही अधिक धमाल रणबीर कपूर याचा चित्रपट करू शकतो. पहिल्यांदाच रणबीर कपूर तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धा कपूर हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला.

IMDB रेटिंगमध्ये तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने पठाण चित्रपटाला मागे टाकले आहे. पठाण चित्रपटाला IMDB ने 10/6.4 रेटिंग दिले होते. आता IMDB तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला 10/6.7 रेटिंग दिले आहे. म्हणजेच पहिल्याच दिवशी शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला रणबीर कपूर याच्या चित्रपटाने मागे टाकले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या ओपनिंग डेही खास ठरला.

शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने बाहुबली चित्रपटाचे रेकाॅर्डही तोडले आहे. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.