Shamshera | रणबीर कपूरच्या शमशेरा’चे वीकेंड कलेक्शन 31.75 कोटींवर, सुपर फ्लॉप ठरण्याची शक्यता?

शनिवारी 10.50 कोटी आणि रविवारी 11 कोटी कमावल्यानंतर आता 'शमशेरा'चे वीकेंड कलेक्शन 31.75 कोटींवर पोहोचले आहे. 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांची स्थिती खूपच चिंताजनक आहे. परंतू रणबीर कपूरच्या चित्रपटाची अवस्था अक्षय कुमारच्या दोन फ्लॉप चित्रपटांपेक्षा वाईट आहे.

Shamshera | रणबीर कपूरच्या शमशेरा'चे वीकेंड कलेक्शन 31.75 कोटींवर, सुपर फ्लॉप ठरण्याची शक्यता?
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 11:34 AM

मुंबई : ‘शमशेरा’चा (Shamshera) ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रणबीर कपूरच्या या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा होत्या. मात्र, शुक्रवारी 22 जून रोजी चित्रपटगृहात शमशेरा प्रदर्शित झाल्यावर काही खास कमाल करू शकला नाही. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय दत्त, वाणी कपूर यासारखे बडे कलाकार शमशेरामध्ये असूनही बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या काही खास झाले नसल्याने आर्श्चय व्यक्त केले जातयं. रणबीरचा स्टॅचर पाहता ‘शमशेरा’कडून किमान 15-20 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन अपेक्षित होते, पण शुक्रवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) फक्त 10.25 कोटींचे कलेक्शन केले. यानंतरही शनिवार-रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये फार काही वाढ झाली नाहीयं.

शनिवारी 10.50 कोटी आणि रविवारी 11 कोटी कमावले

शनिवारी 10.50 कोटी आणि रविवारी 11 कोटी कमावल्यानंतर आता ‘शमशेरा’चे वीकेंड कलेक्शन 31.75 कोटींवर पोहोचले आहे. 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड चित्रपटांची स्थिती खूपच चिंताजनक आहे. परंतू रणबीर कपूरच्या चित्रपटाची अवस्था अक्षय कुमारच्या दोन फ्लॉप चित्रपटांपेक्षा वाईट आहे. ‘शमशेरा’चे ओपनिंग वीकेंड कलेक्शन 2022 च्या टॉप 5 मध्येही नाही. या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा होत्या.

हे सुद्धा वाचा

भूल भुलैया 2

या वर्षात बॉलिवूडमध्ये कोणी चांगली कामगिरी केली असेल तर तो कार्तिक आर्यन आहे. त्याच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीयं. ओपनिंग वीकेंड म्हणजेच पहिल्या 3 दिवसात ‘भूल भुलैया 2’ ने 55.96 कोटींची कमाई केली आणि 2022 मधील टॉप वीकेंड कलेक्शन चित्रपट आहे.

सम्राट पृथ्वीराज

अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा वर्षातील सर्वात मोठा चित्रपट असेल अशी लोकांची अपेक्षा होती. पण या चित्रपटाला सगळीकडून इतके खराब रिव्ह्यू मिळाले की थिएटरमध्ये जाण्यासाठी तयार बसलेल्या लोकांचा मूडच बदलून गेला. पण फ्लॉप घोषित होण्यापूर्वी ‘सम्राट पृथ्वीराज’ने ओपनिंग वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर 39.40 कोटी रुपयांची कमाई केली होती.

शमशेरा

या यादीत रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ 31.75 कोटींसह टॉप 5 नंतर येतो. पहिल्या आठवड्यात चित्रपटाची कमाई 50 कोटींवर पोहोचली तरी ती मोठी गोष्ट असेल. मात्र, यंदा बॉक्स गाजवण्याची आणखी एक संधी रणबीरकडे आहे. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये तो जालिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यासोबत पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे, मात्र, हाही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय कमाल करणार हे पाहण्यासारखेच ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.