Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh: सोशल मीडियावर रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची जोरदार चर्चा; नेटकरी म्हणाले..

रणवीरने मिलिंद सोमणपासून प्रेरणा घेतली वाटतं, असंही काहींनी म्हटलंय. रणवीरच्या या फोटोशूटवर दीपिकाची काय प्रतिक्रिया असू शकते याचाही अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला.

Ranveer Singh: सोशल मीडियावर रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची जोरदार चर्चा; नेटकरी म्हणाले..
Ranveer SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 9:47 AM

अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चित्रविचित्र कपड्यांची चर्चा सोशल मीडियावर होत असते. मात्र आता चक्क त्याने न्यूड फोटोशूट केलं आहे. ‘पेपर’ या मासिकाच्या कव्हरसाठी (Paper magazine cover) त्याने हे फोटोशूट केलं आहे. हे तेच मासिक आहे ज्यामध्ये 2014 मध्ये प्रसिद्ध किम कार्दशियनचं (Kim Kardashian) शॅम्पेन फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. आता रणवीरने टर्किश चादरीवर पूर्णपणे न्यूड फोटोशूट केलं आहे. या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणवीर त्याचे चित्रपट, फॅशन आणि त्याच्या मते न्यूडचा अर्थ काय, याविषयी व्यक्त झाला.

“माझ्यासाठी न्यूड फोटोशूट करणं किंवा एखादा न्यूड सीन करणं खूप सोपं आहे. माझ्या काही चित्रपटांमध्येही तसे सीन्स आहेत. मी हजार लोकांसमोर न्यूड सीन किंवा फोटोशूट करू शकतो. त्याबद्दल मी फार कधी कोणाचा विचार करत नाही. फक्त एवढंच की ते अन्कफर्म्टेबल होतील,” असं तो मुलाखतीत म्हणाला. पेपर मासिकाच्या वेबसाइटवर ही संपूर्ण मुलाखत वाचायला मिळते.

हे सुद्धा वाचा

रणवीरच्या या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर विविध बॉलिवूड पेजेसवर शेअर करण्यात आला आहे. फॅशनवरून सतत चर्चेत असणाऱ्या ‘डाएट सब्या’ या पोर्टलवरही हा फोटो शेअर करण्यात आला आहे. रणवीरने मिलिंद सोमणपासून प्रेरणा घेतली वाटतं, असंही काहींनी म्हटलंय. रणवीरच्या या फोटोशूटवर दीपिकाची काय प्रतिक्रिया असू शकते याचाही अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला. ‘दीपिका दीदी ये देख के क्या बोलेगी?’, असं एकाने म्हटलंय.

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by DietSabya® (@dietsabya)

रणवीर नुकताच ‘रणवीर व्हर्सेस वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या शोमध्ये झळकला होता. नेटफ्लिक्सवर हा शो प्रदर्शित झाला आहे. रणवीर-दीपिकाने नुकतंच शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या बाजूला तब्बल 119 कोटी रुपयांचा बंगला घेतला आहे. चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.