Sunny Kaushal: विकी कौशलचा भाऊ ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट; रणवीर सिंगने केला चर्चांवर शिक्कामोर्तब

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला त्या अभिनेत्रीने हजेरी लावली होती आणि तेव्हापासून तिचं कौशल कुटुंबीयांशी खास नातं असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता रणवीरने त्या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

Sunny Kaushal: विकी कौशलचा भाऊ 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट; रणवीर सिंगने केला चर्चांवर शिक्कामोर्तब
ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात आहे. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 2:57 PM

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या बहुचर्चित शोचा सातवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी एकत्र हजेरी लावली होती. या शोमध्ये दोघांनी आपापल्या खासगी आयुष्यातील बरेच खुलासे केले. इतकंच नव्हे तर या शोमध्ये रणवीरने अभिनेता विकी कौशलच्या भावाविषयी मोठा खुलासा केला. विकी कौशलचा भाऊ सनी कौशल (Sunny Kaushal) कोणाला डेट करत आहे, याबद्दल रणवीरने सांगितलं. विकी आणि कतरिनाच्या लग्नाला त्या अभिनेत्रीने हजेरी लावली होती आणि तेव्हापासून तिचं कौशल कुटुंबीयांशी खास नातं असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता रणवीरने त्या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात शर्वरी वाघ (Sharavari Wagh) आहे. याबद्दल सनी किंवा शर्वरीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

कॉफी विथ करणमध्ये करणने रणवीरला प्रश्न विचारला की कतरिना कैफ आणि विकी कौशल हे कोणासोबत डबल डेटला जाऊ शकतात? त्यावर रणवीरने उत्तर दिलं की सनी आणि शर्वरीसोबत. यामुळेच सनी आणि शर्वरी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय. सनी आणि शर्वरीने कबीर खान दिग्दर्शित ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर शर्वरीला विकी-कतरिनाच्या लग्नात पाहिलं गेलं. विकी-कतरिनाने फक्त खास पाहुण्यांनाच लग्नाला आमंत्रित केलं होतं. शर्वरीनेही सोशल मीडियावर विकी आणि कतरिनासोबतचे फोटो पोस्ट केले होते.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Sharvari ? (@sharvari)

शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये शर्वरीने डेटिंगच्या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं होतं. “मी आणि सनीने एकत्र एका सीरिजमध्ये काम केलंय. त्यावेळी आमची खूप चांगली मैत्री झाली. सीरिजचं शूटिंग संपल्यानंतरही आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. पण मैत्रीपलीकडे आमच्यात काही नाही”, असं ती म्हणाली होती.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.