83 Box Office Collection Day 2 : ख्रिसमसला चालली रणवीर सिंगची जादू, दुसऱ्या दिवशीही83ची जबरदस्त कमाई

रणवीर सिंग(Ranveer Singh)च्या 83 या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. 83नं पहिल्याच दिवशी शानदार ओपनिंग केलंय. चित्रपटाचं दुसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन(Box Office Collection)ही जबरदस्त आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण(Deepika Padukone)ही आहे.

83 Box Office Collection Day 2 : ख्रिसमसला चालली रणवीर सिंगची जादू, दुसऱ्या दिवशीही83ची जबरदस्त कमाई
83
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 10:44 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh)च्या 83 या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालाय. रणवीर सिंगचा चित्रपट प्रदर्शित होताच सगळीकडे धुमाकूळ घातलाय. 83नं पहिल्याच दिवशी शानदार ओपनिंग केलंय. चित्रपटाचं दुसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन(Box Office Collection)ही जबरदस्त आहे.

83नं पहिल्या दिवशी 12 कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट 1983मध्ये जिंकलेल्या विश्वचषकावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसतोय. यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण(Deepika Padukone)ही आहे.

दुसऱ्या दिवशीची कमाई रणवीर सिंगच्या चित्रपटाला ख्रिसमसचा फायदा झालाय. चित्रपटानं दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केलीय. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 16 कोटींचा व्यवसाय केलाय. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 28 कोटी होईल. रिपोर्टनुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन 30-35 टक्क्यांनी वाढेल.

इतरही मोठी स्टारकास्ट कबीर खान दिग्दर्शित, 83मध्ये रणवीर आणि दीपिका यांच्यासह पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, साकिब सलीम, हार्डी संधू, एमी विर्क, जतिन सरना आणि इतर अनेक कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटात नीना गुप्ताही आहेत. त्या कपिल देव यांच्या आईच्या भूमिकेत आहेत.

पुष्पाही पुढे 83सोबतच साऊथचा स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा चित्रपट थिएटरमध्ये आहे. या चित्रपटालाही पसंती मिळतेय. पुष्पा रिलीज झाल्यापासून सिनेमानं अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत. रिलीजच्या 2-3 दिवसांतच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. अल्लू अर्जुन या चित्रपटात स्मगलरच्या भूमिकेत दिसतोय. चंदनाच्या लाकडाची तस्करी करत असल्याचं यात दाखवलंय. तर रश्मिका मंदाना त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे.

Bigg Boss Marathi 3 | थांबायचा नाय आता भिडायचं हाय! 100 दिवस घरात स्वतःची जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले स्पर्धक

Video | ‘हार कर भी जितनेवाले को बाजीगर कहते हैं..’, आशुतोषच्या ‘त्या’ खेळीनी जिंकली प्रेक्षकांची मने!

VIDEO | गुडघ्यावर बसून प्रपोज, Indian Idol फेम सायली कांबळेच्या साखरपुड्यातील हा क्षण पाहिलात?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.