Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंग अडचणीत; सामाजिक कार्यकर्ते पोलिसांत दाखल करणार तक्रार

गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबईतील चेंबूर पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंग अडचणीत; सामाजिक कार्यकर्ते पोलिसांत दाखल करणार तक्रार
Ranveer SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 10:00 AM

न्यूड फोटोशूटप्रकरणी अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) चांगलाच अडचणीत सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबईतील चेंबूर पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय संस्कृतीला धक्का पोहोचवल्याचा आरोप या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘पेपर’ (Paper) या मासिकाच्या कव्हर पेजसाठी रणवीरने न्यूड फोटोशूट (nude photoshoot) केलं होतं. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. अनेकांनी त्यावर मीम्ससुद्धा व्हायरल केले.

रणवीर सिंगचे न्यूड फोटो चालतात, मग हिजाबला विरोध का?

रणवीरच्या या फोटोशूटच्या वादामध्ये समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनीही उडी घेतली. सोलापूरमध्ये बोलताना अबू आझमी म्हणाले की, “रणवीर सिंहने काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. त्याने नंगानाच केला तरी आम्हाला काही अडचण नाही. मात्र, जे लोक हिजाब घालतात त्यांना या देशात विरोध कसा होऊ शकतो? हिजाब परिधान करणाऱ्यांना ठिकठिकाणी अडवलं जात आहे. त्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही. जर तुम्हाला अडचण असेल सुरक्षितेबाबत काळजी वाटत असेल तर वैयक्तिक त्यांची तपासणी करून चौकशी करा. मात्र हिजाबवर बंदी तुम्ही आणू शकत नाही.”

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by DietSabya® (@dietsabya)

रणवीर नुकताच ‘रणवीर व्हर्सेस वाईल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या शोमध्ये झळकला होता. नेटफ्लिक्सवर हा शो प्रदर्शित झाला आहे. रणवीर-दीपिकाने नुकतंच शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या बाजूला तब्बल 119 कोटी रुपयांचा बंगला घेतला आहे. चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...