Ranveer Singh | नव्या वर्षातही रणवीर सिंह शॉकमध्येच, हा व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय
रोहित शेट्टीचा प्रत्येक चित्रपट हा बाॅक्स आॅफिसवर धमाका करतो.
मुंबई : सर्वत्र 2023 चे जोरदार स्वागत केले जात आहे. बाॅलिवूडचे कलाकार सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. यादरम्यानच आता रणवीर सिंह याची एक पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. 23 डिसेंबरला रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काहीच धमाका करू शकला नाही. रोहित शेट्टीचा प्रत्येक चित्रपट हा बाॅक्स आॅफिसवर धमाका करतो. परंतू सर्कस हा चित्रपट अपवाद ठरला आहे. सर्कस हा एक काॅमेडी आहे.
रणवीर सिंह याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. फॉरेस्ट गंपचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण टॉम हँक्ससोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे, पण लेफ्टनंट डॅन उदास बसलेला दिसतोय.
रणवीर सिंह याचे गेल्या काही दिवसांपासून सतत चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. एका मागून एक असे तीन चित्रपट रणवीर सिंहचे फ्लाॅप गेले आहेत. अनेकांनी रणवीरचा हा व्हिडीओ पाहून म्हटले आहे की, रणवीर याने बहुतेक सर्कस हा चित्रपट बघितला आहे.
View this post on Instagram
रणवीर सिंहच्या सर्कस या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता.
रोहित शेट्टी याचा हा चित्रपट बिग बजेटचा होता. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाची मोठी चर्चा होती. परंतू चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.
रोहित शेट्टी याने या चित्रपटासाठी कलाकारांना मोठे मानधन दिले होते. मात्र, चित्रपट प्रत्यक्षात बाॅक्स आॅफिसवर चित्रपटाचे बजेट देखील काढू शकला नाही. रणवीर पुढचे चित्रपट काय धमाका करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.