Video | नाचता नाचता चुकली रणवीर सिंहची स्टेप, अक्षय कुमार म्हणाला, ‘संभाळ, नाहीतर….’
कोरोना संकटामुळे दोन वर्षांपासून रिलीजची वाट पाहिल्यानंतर आता अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 'सिम्बा' आणि 'सिंघम' देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर याविषयी बरीच चर्चा रंगली आहे.
मुंबई : कोरोना संकटामुळे दोन वर्षांपासून रिलीजची वाट पाहिल्यानंतर आता अक्षय कुमार स्टारर ‘सूर्यवंशी’ रिलीजसाठी सज्ज झाला आहे. ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’ देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर याविषयी बरीच चर्चा रंगली आहे. पण आता चित्रपट रिलीज होण्याआधी रणवीर सिंहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने नाचताना स्वतःच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत केली आहे.
या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आणि रणवीर सिंह चित्रपटाच्या सेटवर पोलिसांच्या गणवेशात दिसत आहेत. या दरम्यान, रणवीर अक्षय कुमारच्या ‘बाला-बाला’ गाण्याचे सिग्नेचर स्टेप शिकताना दिसत आहे. दोन्ही स्टार्स पूर्ण एनर्जीने डान्स करतात, पण मध्येच रणवीरचा हात चुकीच्या ठिकाणी लागतो आणि वेदनांमुळे त्याने डान्स करणेच सोडले. मग सेटवर सगळे हसायला लागतात.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
अक्षय कुमार म्हणाला, ‘सांभाळ नाहीतर…’
अक्षय कुमारने स्वतः हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा मजेदार व्हिडीओ शेअर करत अक्षय कुमारने एक मजेदार इशाराही दिला आहे. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ही आहे रणवीर सिंह आणि माझी #AilaReAillaaStep. तुमचे सर्वोत्तम नृत्य पाऊल पुढे टाका आणि मलाही ही स्टेप करून दाखवा.’ पुढे त्याने लिहिले की, ‘चेतावणी: एक चुकीचे पाऊल भविष्यातील नियोजनासाठी हानिकारक ठरू शकते.’
तिन्ही सुपरस्टार्सचा जोरदार डान्स
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील गाणे, ‘आयला रे आयला’ हे गेल्या दशकातील ब्लॉकबस्टर ट्रॅकचे उत्तम मिश्रण आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह एकत्र डान्स करताना दिसत आहेत. रोहित शेट्टीच्या या चित्रपटाचे चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत.
5 नोव्हेंबरला रिलीज होणारा चित्रपट
‘सूर्यवंशी’ हा चित्रपट रिलीजबाबत बऱ्याच काळापासून अडचणीत आहे. हा चित्रपट जवळपास दोन वर्षांपूर्वी रिलीज होणार होता, तो आता अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
अक्षयचं ‘आयला रे आयला’ गाणं येताच हिट
या गाण्यात एक ट्विस्ट म्हणजे यात रणवीर सिंह आणि अजय देवगण देखील आहेत. एवढेच नाही, तर यात एक ट्विस्ट आहे की अजय देवगणच्या चित्रपटांची गाणी आणि रणवीर सिंहच्या चित्रपटांची स्टाईल देखील या गाण्यात घातली गेली आहे. उदाहरणार्थ, रणवीर सिंहच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘मल्हारी’ या गाण्याची स्टाईल तुम्हाला या गाण्यात पाहायला मिळेल. गाणे पाहणे आणि ऐकणे खूप मजेदार आहे. या गाण्याचे संगीत बदलून तनिष्क बागचीने त्याला एक नवीन रंग दिला आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी लिहिले आहेत आणि दलेर मेहंदी यांनी त्यांच्या आवाजाने हे गाणे सजवले आहेत.
सूर्यवंशी चित्रपटाची टीम त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सध्या, अक्षय कुमार ऊटीमध्ये राम सेतू चित्रपटाचे शूटिंग करत आहे, म्हणून कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी घेतली आहे.
आणखी दोन गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
असे सांगितले जात आहे की, चित्रपटाचे प्रमोशन करताना रोहित शेट्टीने चित्रपटाच्या रिलीजपूर्वी तीन गाणी रिलीज करण्याची योजना आखली आहे. यातील एक गाणे ‘आयला रे आयला’ उद्या म्हणजेच गुरुवारी रिलीज होत आहे. उर्वरित दोन देखील चित्रपट रिलीज होण्यापूर्वी प्रदर्शित केले जाऊ शकतात. सध्या, अक्षय कुमारचे चाहते उद्या रिलीज होणाऱ्या गाण्याचा टीझर पाहून त्याचा पूर्ण व्हिडीओ रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा स्फोटक टीझर प्रेक्षकांना खूप आवडत आहे. टीझर जितका दणकेदार आहे, तितकाच गाणेही तितकेच धमाकेदार असेल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
Ananya Panday | आर्यन-अनन्याच्या संभाषणाची सखोल चौकशी होणार, अनन्या पांडे पुन्हा NCBला सामोरी जाणार!