83 The Film | रणवीरचा ‘83’ बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप! अभिनेत्याच्या मानधनातही कपात होणार!
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपट ‘83’ रिलीज होण्यापूर्वी केवळ निर्मात्यांनाच नाही तर प्रेक्षकांनाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपट ‘83’ रिलीज होण्यापूर्वी केवळ निर्मात्यांनाच नाही तर प्रेक्षकांनाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दमदार ठरला आहे आणि आता बातम्या येत आहेत की, या चित्रपटातून रणवीरचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात केवळ 58 कोटींचा व्यवसाय केला आहे.
फीमध्येही कपात होणार?
‘83’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हा चित्रपट 2021 मधील सर्वात मोठा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचे झेंडे रोवेल, तर निर्मात्यांनाही या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय होईल अशी आशा होती. मात्र, आता याची कामगिरी पाहता या सगळ्यावर पाणी फिरले आहे.
इतकंच नाही तर हा चित्रपट फ्लॉप असल्याचं म्हटलं जात असून, सर्वात जास्त नुकसान चित्रपटाचा आघाडीचा स्टार रणवीर सिंहच झालं आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार आता रणवीरच्या फीमध्ये देखील कपात होणार आहे. काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की, अलीकडील ट्रॅक रेकॉर्ड आणि त्याच्या वाढत्या फॅन फॉलोइंगचा विचार करता रणवीर दुहेरी डबल चार्ज घेणार अशी चर्चा होती.
‘83’ या चित्रपटासाठी, रणवीर सिंहने निर्मात्यांना 20 कोटी फी व्यतिरिक्त नफ्यातील वाटा मागितला होता. परंतु, ज्या प्रकारे चित्रपट फ्लॉप झाला, त्यामुळे त्याला देखील आता किंमत मोजावी लागणार आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट केवळ 58 कोटींच्या जवळपास पोहोचू शकला.
‘मुगले आझम’शी तुलना
‘83’ या चित्रपटाचा ज्या प्रकारे भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला होता आणि चित्रपट कलाकारांनपासून ते क्रिकेट स्टार्सपर्यंत सर्वांनी याचे प्रमोशन केले होते. त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट होईल असे वाटले होते. तर इंडस्ट्रीतील एका मोठ्या वर्गाला हा एक उत्तम चित्रपट असल्याचे वाटत होते. अनेकांनी या चित्रपटाची तुलना ‘शोले’ आणि ‘मुघल-ए-आझम’ यांसारख्या चित्रपटांशी केली, पण ही तुलना या हिट चित्रपटांच्या जवळपास देखील पोहोचू शकली नाही.
‘Omicron’ बनले कारण!
‘83’च्या फ्लॉप होण्याचे कारण केवळ साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ किंवा हॉलिवूड चित्रपट ‘स्पायडर-मॅन नो वे होम’ हेच नाही तर देशात वाढणाऱ्या ओमिक्रॉन व्हायरसची भीती देखील आहे. हे देखील एक कारण आहे की, लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा धोका पत्करू इच्छित नाहीत आणि जे जाणार आहेत ते ‘पुष्पा’ आणि ‘स्पायडर मॅन नो वे होम’ पाहण्यात रस दाखवत आहेत.