रणवीर शौरीवर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील ‘या’ खास व्यक्तीचं निधन
क्रिशन देव शौरी (KD Shorey) यांचं शुक्रवारी (शनिवार) संध्याकाळी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. शनिवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट लिहित रणवीरने याबद्दलची माहिती दिली.
अभिनेता रणवीर शौरीचे (Ranvir Shorey) वडील आणि दिग्गज निर्माते क्रिशन देव शौरी (KD Shorey) यांचं शुक्रवारी (शनिवार) संध्याकाळी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. शनिवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट लिहित रणवीरने याबद्दलची माहिती दिली. के. डी. शौरी यांचा फोटो पोस्ट करत रणवीरने भावना व्यक्त केल्या.
‘माझे वडील क्रिशन देव शौरी यांचं काल रात्री निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या असंख्य आठवणी आमच्यासाठी मागे सोडल्या आहेत. मी माझ्या सर्वात मोठ्या प्रेरणेला गमावलं आहे’, अशी पोस्ट रणवीरने लिहिली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत सहवेदना व्यक्त केल्या. ‘भावपूर्ण श्रद्धांजली, ओम शांती, सद्गती’, असं के. के. मेननने लिहिलं.
View this post on Instagram
के. डी. शौरी हे 1970 आणि 1980 च्या काळातील प्रसिद्ध निर्माते होते. जिंदा दिल, बेरहम आणि बॅड और बदनाम यांसारख्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती दिली. याशिवाय त्यांनी 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महायुद्ध’ या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा केलं. या चित्रपटात परेश रावल, मुकेश खन्ना, कादर खान आणि गुलशन ग्रोव्हर यांनी भूमिका साकारल्या होत्या. के. डी. शौरी यांनी आपल्या दोन चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराचीही भूमिका साकारली होती.
रणवीर शौरीने बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकताच तो ‘420 आयपीसी’ या चित्रपटात झळकला. झी5 वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याशिवाय रणवीर ‘मुंबईकर’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘मानगरम’ या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हा रिमेक आहे.