तापसीच्या आगामी चित्रपटातील ‘या’ व्यक्तीचे कोरोनामुळे निधन, सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली
लोकप्रिय चित्रपट संपादक अजय शर्मा (Ajay Sharma) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर कोरोना उपचार सुरु होते. त्याच दरम्यान काल (5 मे) रात्री अजय यांची प्राणज्योत मालवली.
मुंबई : लोकप्रिय चित्रपट संपादक अजय शर्मा (Ajay Sharma) यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर कोरोना उपचार सुरु होते. त्याच दरम्यान काल (5 मे) रात्री अजय यांची प्राणज्योत मालवली. ते गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाविरूद्ध युद्ध लढा देत होते. मंगळवारी रात्री त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. अजयच्या मृत्यूवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट्स शेअर करुन सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे (Rashmi Rocket fame film editor Ajay Sharma passed away during corona treatment).
अजय शर्मा सध्या तापसी पन्नूच्या ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाचे काम करत होते. वृत्तानुसार, अजय कोरोना पॉझिटिव्ह होते आणि गेल्या दोन आठवड्यांपासून ते दिल्लीच्या राजीव गांधी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते. अजय विवाहित होते आणि त्यांना एक 4 वर्षाचा मुलगा देखील आहे. त्यांच्या अशा जाण्याने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
श्रिया पिळगावकरचे ट्विट
Devasted is an understatement ? We lost Ajay Sharma today. Not just an incredibly fine editor but an absolute gem of a human being . Nothing makes sense .
— Shriya Pilgaonkar (@ShriyaP) May 5, 2021
‘आज आपण अजयला गमावले. ते एक उत्तम संपादक तसेच एक अप्रतिम व्यक्ती होते. जे झाले ते योग्य झाले नाही.’
Life is so unfair. Rest in Peace, Ajay Sharma, a great talent gone too soon. My heartfelt condolences to his family & friends during this difficult time. ?️? https://t.co/NoSLctK7AR
— T.S.Suresh (@editorsuresh) May 5, 2021
चित्रपटाचे संपादक टीएस सुरेश यांनी ट्विट केले- ‘आयुष्य खूपच चुकीचे करते. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो. एक उत्तम प्रतिभा खूप लवकर निघून गेली.’ दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनीही ट्विट केले ‘देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.’(Rashmi Rocket fame film editor Ajay Sharma passed away during corona treatment)
10 दिवसांपूर्वी अशोक पंडित यांनी मागितली मदत
?SOS? Urgently need #OxygenBed in #Delhi for Film Editor Ajay Sharma. His oxygen levels have dropped to 83. Area: Shahdara Contact info: +91 70426 61145 Arun +91 99990 61526 Kritika@The_NehaJoshi @CharuPragya @TajinderBagga
— Ashoke Pandit (@ashokepandit) April 25, 2021
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अजयच्या मृत्यूच्या 10 दिवस आधी ट्विट करुन अजयसाठी ऑक्सिजन बेडची मदत मागितली होती. त्यांनी ट्विट करून असे लिहिले होते की, फिल्म एडिटर अजय शर्मा यांना दिल्लीमध्ये तत्काळ ऑक्सिजन बेडची आवश्यकता आवश्यक आहे. त्याची ऑक्सिजन पातळी 83 वर आली आहे.’
याआधी अजय शर्मा यांनी ‘जग्गा जासूस’, वेब सीरिज ‘बंडिश बॅन्डिट्स’, ‘लुडो’, ‘कारवां’, ‘क्रूक’, ‘तुम मिले’, ‘प्यार का पंचनामा’ यासह अनेक चित्रपटांसाठी काम केले होते. ‘बर्फी’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘अग्निपथ’, ‘काय पो छे’ यासारख्या बर्याच चित्रपटात त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केले होते.
(Rashmi Rocket fame film editor Ajay Sharma passed away during corona treatment)
हेही वाचा :
Radhe Title Track | सलमानचा स्वॅग, दिशा पाटनीचा हॉट लूक, पाहा ‘राधे’चा जबरदस्त टायटल ट्रॅक
‘रामायणा’तील ‘रावणा’च्या निधनाची अफवा, ‘लक्ष्मण’ सुनील लहरींनी सांगितली सत्य परिस्थिती