मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मात्र, अजून रश्मिका किंवा विजय यांनी यावर काहीच भाष्य केले नाहीये. काही दिवसांपूर्वी रश्मिका सुट्टया घालवण्यासाठी मालदीवला गेली होती, त्यावेळी रश्मिका विजय देवरकोंडासोबतच गेल्याची एक चर्चा जोर धरू लागली. रश्मिका आणि विजय डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू आहेत. गुड बाय चित्रपटाच्या माध्यमातून रश्मिकाने आता बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून रश्मिका मंदाना सतत ट्रोल केले जातंय. यावर आता रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीये. रश्मिकाने या पोस्टमध्ये ट्रोल करणाऱ्यांना जोरदार उत्तर दिले असून ट्रोलर्समुळे किंवा काही अफवांमुळे आपल्याला किती त्रास होतोय, हे सांगण्याचा प्रयत्न रश्मिकाने केलाय. इतकेच नाही तर हे सर्व यापूर्वीच करायला हवे होते, असेही रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रश्मिकाने लिहिले की, जेव्हापासून मी माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हापासून मला खूप द्वेषाचा सामना करावा लागला आहे. हे ट्रोल आणि नकारात्मक लोकांसाठी पंचिंग बॅगसारखे आहे. मला माहित आहे की मी निवडलेल्या लाईफची मोठी किंमत मोजावी लागेल. मला समजले आहे की मी सर्वांसाठी चहासारखी नाहीये आणि प्रत्येकाकडून प्रेमाची अपेक्षा देखील करू शकत नाही. याचा अर्थ तुम्ही लोकांनी मला आत्तापर्यंत स्वीकारले नाही आणि नकारात्मकता पसरवली आहे.
मला फक्त हेच माहीत आहे की मी माझ्या चांगल्या कामाने तुम्हा सर्वांना जिंकू शकते. माझे काम हेच तुम्हाला माझ्यासोबत सर्वात जास्त आनंदी करते, हीच माझी काळजी आहे. ज्या गोष्टींचा तुम्हाला आणि मला अभिमान वाटतो. त्या गोष्टी समोर आणण्याचा मी खरोखरच प्रयत्न करत आहे. इंटरनेटवर पसरवले जाणारे खोटे माझ्या आणि माझ्या नातेसंबंधासाठी खूप हानिकारक असू शकते, मग ते इंडस्ट्रीमध्ये असो किंवा बाहेर. असे रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.