Box Office: प्रदर्शनानंतर पहिल्याच सोमवारी ‘रॉकेटरी’, ‘राष्ट्रकवच : ओम’ दणक्यात आपटला, ‘जुग जुग जियो’च्या कमाईतही घसरण

पहिल्या आठवड्यात हा चित्रपट 6 कोटींचीही कमाई (Box Office Collection) करू शकणार नाही, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. इतकंच नव्हे तर एका आठवड्यानंतर हा चित्रपट सिंगल स्क्रीनवरून हटवला जाईल आणि त्याची जागा 'खुदा हाफिज 2' घेईल, असंही म्हटलं जात आहे.

Box Office: प्रदर्शनानंतर पहिल्याच सोमवारी 'रॉकेटरी', 'राष्ट्रकवच : ओम' दणक्यात आपटला, 'जुग जुग जियो'च्या कमाईतही घसरण
MoviesImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 4:26 PM

आदित्य रॉय कपूरची (Aditya Roy Kapoor) मुख्य भूमिका असलेला ‘राष्ट्रकवच: ओम’ (Rashtra Kavach Om) हा ॲक्शनपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी चित्रपचाची कमाई सुमारे 55 टक्क्यांनी कमी झाली आहे. सोमवारी या चित्रपटाने केवळ 60 लाखांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई केवळ 4.75 कोटी रुपये इतकी आहे. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट 6 कोटींचीही कमाई (Box Office Collection) करू शकणार नाही, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. इतकंच नव्हे तर एका आठवड्यानंतर हा चित्रपट सिंगल स्क्रीनवरून हटवला जाईल आणि त्याची जागा ‘खुदा हाफिज 2’ घेईल, असंही म्हटलं जात आहे.

‘राष्ट्रकवच: ओम’ची कमाई-

शुक्रवार- 1.35 कोटी रुपये शनिवार- 1.25 कोटी रुपये रविवार- 1.50 कोटी रुपये सोमवार- 60 लाख रुपये एकूण- 4.70 कोटी रुपये

‘रॉकेटरी’ची अवस्थाही वाईट

आर. माधवनची मुख्य भूमिका असलेल्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’च्या हिंदी व्हर्जननेही रिलीजच्या चौथ्या दिवशी केवळ 60 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 4.50 कोटींचाच माफक गल्ला जमवला आहे. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट जवळपास 6.25 कोटींची कमाई करू शकेल, असा अंदाज आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तमिळनाडूमध्येही या चित्रपटाची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.

‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ची कमाई-

शुक्रवार- 65 लाख रुपये शनिवार- 1.30 कोटी रुपये रविवार- 1.90 कोटी रुपये सोमवार- 60 लाख रुपये एकूण- 4.45 कोटी रुपये

जुग जुग जियोच्या कमाईतही घसरण

वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने ‘रॉकेटरी’ आणि ‘राष्ट्रकवच: ओम’ या चित्रपटांपेक्षा थोडा चांगला व्यवसाय केला. सोमवारी या चित्रपटाने केवळ 1.75 कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने 65 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 20 कोटींपर्यंत कमाई करेल असा अंदाज आहे.

जुग जुग जियोची कमाई-

पहिला आठवडा – 50.17 कोटी रुपये शुक्रवार – 2.75 कोटी रुपये शनिवार – 4.75 कोटी रुपये रविवार – 5.75 कोटी रुपये सोमवार – 1.75 कोटी रुपये एकूण- 65.17 कोटी रुपये

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.