Raveena Tandon | मलायका अरोराच्या अगोदर रवीना टंडन हिला होती छैय्या छैय्या गाण्याची ऑफर, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा ही कायम चर्चेत असते. मलायका हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मलायका हिच्या हातामधून फोन पडल्याचे दिसत होते. आता मलायका अरोरा हिच्या छैय्या छैय्या गाण्याबद्दल रवीना टंडन हिने मोठा खुलासा केलाय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. मात्र, मलायका अरोरा (Malaika Arora) हिला खरी ओळख ही छैय्या छैय्या या गाण्यामुळेच मिळालीये. अनेकजण आजही छैय्या छैय्या (Chaiyya Chaiyya) या गाण्याला तेवढेच प्रेम करतात. छैय्या छैय्या गाण्यावर आजही लोक धमाकेदार पध्दतीने डान्स करतात. विशेष म्हणजे हे गाणे ट्रेनवर शूट करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये मलायका अरोरा हिच्यासोबत शाहरूख खान (Shah Rukh Khan) हा दिसतो. हे गाणे सुपरहिट ठरले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळाले आहे आणि एक काळ या गाण्याने प्रचंड गाजवलाय.
छैय्या छैय्या हे गाणे शूट करत असताना मलायका अरोरा हिला मोठा दुखापत देखील झाली होती. याचा खुलासा स्वत: काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा हिने केला होता. मात्र, तुम्हाला माहितीये का? मलायका अरोरा हिच्या अगोदर या गाण्याची आॅफर ही रवीना टंडनला देण्यात आली होती. फक्त रवीना टंडन हिच नाहीतर शिल्पा शेट्टी हिला देखील या गाण्याची आॅफर होती.
रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांनी या गाण्याला करण्यास नकार दिला होता. या दोघींनंतर या गाण्याची आॅफर मलायका अरोरा हिला मिळाली आणि विशेष म्हणजे मलायका अरोरा हिने हे गाणे करण्यास होकार देखील दिला आणि हे गाणे सुपरहिट ठरले. या गाण्याची मोठी क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळाली.
अखेर इतक्या वर्षांनंतर रवीना टंडन हिने छैय्या छैय्या गाण्याला नकार देण्याचे कारण स्पष्ट केले आहे. रवीना टंडन हिने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, शहर की लडकी हे गाणे हिट ठरल्यानंतर मला लगेचच छैय्या छैय्या गाण्याची आॅफर आली होती. मात्र, मी या गाण्याला नकार दिला.
मी शहर की लडकी हे गाणे केल्यानंतर छैय्या छैय्या गाण्याला नकार दिला. कारण मला शहर की लडकी या गाण्यानंतर फक्त आणि फक्त आयटम सॉन्गच्याच आॅफर येत होत्या. त्यामुळे मी छैय्या छैय्या या गाण्याला नकार दिला. रवीना टंडन ही कायमच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रवीना टंडन हिने खुलासा केला की, मला स्वयंपाक अजिबात तयार करता येत नाही.