खरोखरच पाकिस्तानमध्ये ‘शेरशाह’ वर बंदी घातलीय का? जाणून घ्या यामागील सत्य…
अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे विशेषतः शेरशाहसाठी कौतुक केले जात आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकला या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हटले जात आहे.
मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा चित्रपट शेरशाह नुकताच प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी अॅमेझॉनवर शेरशाह रिलीज केला आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. हा चित्रपट OTT वर रिलीज करण्यात आला आहे. (Really shershaah movie is banned in pakistan?)
आता अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे विशेषतः शेरशाहसाठी कौतुक केले जात आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बायोपिकला या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हटले जात आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये अशी बातमी आहे की, पाकिस्तानमध्ये शेरशाह चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
चित्रपट बंदीबद्दल कोणी दिली माहिती
NBT च्या बातमीनुसार, एक पाकिस्तानी YouTuber Ahmr Khokhar ने त्याचे YouTube चॅनेल Mr. Ahmr द्वारे ही माहिती आता सर्वांसमोर आणली आहे. यामध्ये म्हटंले आहे की, पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी असली, तरी तो पाहायचा आहे. मात्र, हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज झाला आहे की नाही याबाबत कोणतेही अधिकृत अपडेट नाही.
मात्र, जेव्हापासून ही गोष्ट समोर आली आहे, तेव्हापासून चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक असा अंदाज लावत आहेत की पाकिस्तानला कॅप्टन विक्रम बत्रा यांची शौर्यगाथा दाखवायची नाही, त्यामुळे चित्रपटावर बंदी घातली गेली असावी. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटावर बंदी घालण्याची ही पहिली वेळ नाही.
यापूर्वी फँटम चित्रपटावर बंदी होती. तसेच बैंगिस्तान, एक था टाइगर , राझंणा, भाग मिल्खा भाग, एजेंट विनोद, तेरे बिन लादेन असे अनेक चित्रपट आहेत. ज्यांवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. आता चाहत्यांच्या नजरा अधिकृत विधानावर आहेत, जेव्हा शेरशाहचे निर्माते स्पष्ट करतात की या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये खरोखर बंदी आहे की नाही.
संबंधित बातम्या :
(Really shershaah movie is banned in pakistan?)