Pushpa | ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनची रेकॉर्ड ब्रेक कमाई, ‘केजीएफ 1’लाही टाकलं मागे! पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन…
'स्पायडरमॅन : नो वे होम' या हॉलिवूड चित्रपटासह प्रदर्शित झालेला चित्रपट 'पुष्पा' (Pushpa The Rise) सध्या जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्व ट्रेड विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आहे.
मुंबई : ‘स्पायडरमॅन : नो वे होम’ या हॉलिवूड चित्रपटासह प्रदर्शित झालेला चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) सध्या जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनने सर्व ट्रेड विश्लेषकांना आश्चर्यचकित केले आहे. आणि या चित्रपटाने असा विक्रम केला आहे, जो ऐकून अल्लूच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही.
अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षक पसंती देत आहेत. तमिळ, तेलगू या साऊथच्या चित्रपटांची क्रेझ आणि लोकप्रियता प्रचंड आहे. पण, हिंदी सिनेविश्वातही साऊथच्या चित्रपटांनाही मोठा प्रेक्षकवर्ग आहे आणि हे आता सिद्ध झाले आहे. किंबहुना, तेलुगु चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालणारा अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही आपली ताकद दाखवत आहे.
KGF 1 ला टाकले मागे!
चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे आणि अल्लू अर्जुनचे स्टारडम सिद्ध केले आहे. ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहता यांनी ट्विटरवर माहिती शेअर करताना सांगितले आहे की, कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने इतर दक्षिण हिंदी डब चित्रपटांना मागे टाकले आहे. तर आतापर्यंत KGF हिंदी या यादीत आघाडीवर होता.
BREAKING NEWS: ‘PUSHPA’(Hindi) crosses ‘KGF’(Hindi) lifetime collections!Sprints ahead of ‘KGF’, netting Rs. 45.5 crore in 13days. It was hugely promoted on World’s No. 1 YouTube movie channel GOLDMINES and on DHINCHAAK TV, currently the No. 1 movie channel in Urban & Rural India pic.twitter.com/qtfgRcuv9I
— Komal Nahta (@KomalNahta) December 30, 2021
गेल्या तीन वर्षांत हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या दक्षिण भारतीय चित्रपटांबद्दल बोलायचे तर, 2018 मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट ‘KGF चॅप्टर 1’ बद्दल सर्वात जास्त चर्चा झाली. परंतु, पुष्पाने KGF चॅप्टर 1ला देखील मागे टाकले आहे. ‘पुष्पा’ हिंदीने 13 दिवसांत 45.5 कमाई केली असून, आता अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे.
हिंदी चित्रपटप्रेमींनी आवडला ‘पुष्पा’
खरंच, ‘पुष्पा द राइज’ बॉलिवूडसाठी एक सरप्राईज म्हणून आला आहे. क्वचितच कोणीही अपेक्षा केली असेल की मोठ्या जाहिरातीशिवाय, पुष्पा हिंदी भाषिक लोकांमध्ये इतकी लोकप्रियता मिळवेल. अल्लू अर्जुनचा हा पहिला चित्रपट आहे, जो हिंदी तसेच तेलुगुमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शित झाला होता. 17 डिसेंबरला पुष्पा तेलुगूसह हिंदी भाषेतही रिलीज झाला. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदीत 3 कोटींचा व्यवसाय केला.
चित्रपटाची कथा पुष्पा राजची (अल्लू अर्जुन) आहे, जो लाल चंदनाच्या लाकडाची तस्करी करण्याच्या व्यवसायात प्रवेश करतो. अल्लू अर्जुनशिवाय रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.