Video | पठाण चित्रपट आवडला नाही म्हणताच शाहरुख खान हैरान, म्हणाला आता अधिक मेहनत…
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरला. कारण शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची वाट चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून पाहात होते.
मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला फक्त देशामध्येच नाही तर विदेशामध्येही मोठे प्रेम मिळत आहे. पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी करतोय. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे कमाईच्या आकड्यांमध्ये पठाण चित्रपटाने आमिर खान याच्या दंगल चित्रपटाला देखील मागे टाकले. विशेष बाब म्हणजे चित्रपटाने ओपनिंग डेलाच धमाका केला होता. पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. आता या चित्रपटाला रिलीज होऊन जवळपास ११ दिवस झाले असतानाही चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी क्रेझ बघायला मिळत आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये शेवटी शाहरुख खान हा झिरो या चित्रपटामध्ये दिसला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला होता. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरला. कारण शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची वाट चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून पाहात होते.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली होती. सोशल मिडियावर पठाणच्या विरोधात मोहिम सुरू होती.
पठाण चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाची एक मोठी क्रेझ बघायला मिळाली.
Oh oh!! Have to work harder now. Back to the drawing board. Can’t let the younger audience be disappointed. Desh ke youth ka sawaal hai. PS: Try DDLJ on her please….maybe she is the romantic types….kids u never know! https://t.co/UBpSnLOZrf
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 5, 2023
पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान याचे काैतुक अनेकांनी केले. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. मात्र, याला शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट अपवाद ठरला आहे. कारण पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाल केलीये.
पठाण चित्रपटामुळे शाहरुख खान याचे सर्वत्र काैतुक होत असतानाच सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये या मुलीला विचारण्यात येतंय की, अहाना कोणता चित्रपट पाहिला? यावर ती लहान मुलगी गोड आवाजात म्हणते की पठाण…परत तिला विचारले जाते की, पठाण चित्रपट आवडला का? यावर ती मुलगी नाही असे म्हणते…
हा व्हिडीओ अभिषेक कुमार याने शेअर केलाय. आता थेट हा व्हिडीओ शाहरुख खान याने रिशेअर करत लिहिल की, ओह ओह…आता अजून जास्त मेहनत करावी लागणार आहे…ड्राइव्ह बोर्डवर परत जात आहे…तरूण दर्शकांना निराश नाही करू शकत…देशातील तरुणांचा प्रश्न आहे…तिला DDLJ दाखवा…कदाचित ती रोमँटिक प्रकारची असेल आता शाहरुख खान याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.