रितेश देशमुखने सांगितलं शाहरुखच्या ‘मन्नत’चं सीक्रेट

शाहरुख खानच्या घरातील पार्टीमध्ये 'ही' गोष्ट असते सर्वांत खास

रितेश देशमुखने सांगितलं शाहरुखच्या 'मन्नत'चं सीक्रेट
Riteish Deshmukh, Shah Rukh Khan and GeneliaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 4:00 PM

मुंबई- बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मन्नत (Mannat) बंगल्यावर एकदा तरी जायला मिळावं अशी अनेक बॉलिवूड कलाकारांची इच्छा असते. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान हे अनेकदा पार्टीचं आयोजन करतात. इंडस्ट्रीतील सहकारी आणि मित्रमैत्रिणींना ते या पार्टीचं आमंत्रण देतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) या पार्ट्यांमधली एक खास गोष्ट सांगितली आहे. यावेळी त्याने शाहरुखचं विशेष कौतुक केलं आहे.

रितेश आणि शाहरुखने ‘हे बेबी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यामध्ये शाहरुखने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. रितेश या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांपैकी एक होता. तेव्हापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रितेशने शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरील पार्ट्यांचा उल्लेख केला.

‘अनफिल्टर्ड बाय समदिश’ या कार्यक्रमात रितेशला मन्नत आणि शाहरुखबद्दल एका गोष्टीचा खुलासा करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी रितेश म्हणाला, “मन्नत बंगल्यावर जेव्हा कधी गेट-टुगेदर असतं, तेव्हा पहाटे 3 वाजता जेवणाची व्यवस्था केली जाते. पण मन्नतबद्दलची सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे आयोजक. जेव्हा तुम्ही पार्टी संपल्यानंतर निघता आणि तुमच्या कारकडे जाता, तेव्हा तो स्वत: तुमच्याजवळ येतो आणि कारचा दरवाजा उघडतो. आलेल्या पाहुण्यांना गुडबाय करण्यासाठी तो स्वत: बाहेर येतो आणि ती व्यक्ती म्हणजे स्वत: शाहरुख खान.”

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे शाहरुखच्या याच सवयीचा वैताग आल्याचं त्याची पत्नी गौरी खानने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सांगितलं होतं. “तो नेहमीच पाहुण्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडायला जातो. कधीकधी मला वाटतं तो पार्टीदरम्यान घरात जास्त वेळ घालवण्याऐवजी बाहेरच जास्त वेळ असतो. मग अनेकदा लोक त्याला शोधू लागतात. मला असं वाटू लागतं की आम्ही घरात नव्हे तर बाहेर रस्त्यावर पार्टीचं आयोजन केलं आहे”, असं गौरी म्हणाली होती.

शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच वर्षांनी तो मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. याआधी ‘ब्रह्मास्त्र’मध्ये त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. याशिवाय तो दिग्दर्शक अटलीच्या ‘जवान’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.