‘नागराज मंजुळेंचा चित्रपट तुम्हाला..’; ‘झुंड’बाबत रितेश देशमुखचं खास ट्विट

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्यासोबत पहिल्यांदाच ‘झुंड’मध्ये (Jhund) काम केलं. आमिर खान, धनुष, जितेंद्र जोशी, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांसारख्या कलाकारांनंतर आता अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) ट्विटरवर 'झुंड'चं कौतुक केलं आहे.

'नागराज मंजुळेंचा चित्रपट तुम्हाला..'; 'झुंड'बाबत रितेश देशमुखचं खास ट्विट
Riteish Deshmukh on JhundImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:43 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्यासोबत पहिल्यांदाच ‘झुंड’मध्ये (Jhund) काम केलं. या चित्रपटाला सर्व बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमिर खान, धनुष, जितेंद्र जोशी, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांसारख्या कलाकारांनंतर आता अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) ट्विटरवर ‘झुंड’चं कौतुक केलं आहे. रितेशने चाहत्यांना सिनेमा हॉलमध्ये जाऊन ‘झुंड’ पाहण्याचं आवाहनही केलं आहे. रितेशने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’च्या मोठ्या पोस्टरसमोर पोझ देताना दिसत आहे. ‘अमिताभ बच्चन सर, तुम्ही चित्रपटात अप्रतिम काम केलं. तुमचं मौनच लाखो शब्द बोलतात. तुम्हा अशा भूमिकेत स्क्रीनवर पाहणं म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा परफेक्ट आहे. कास्टिंग टीमचं कौतुक करायला हवं’, अशा शब्दांत त्याने कौतुकाच वर्षाव केला आहे. रितेशने चित्रपटातील अजय-अतुलच्या संगीताचीही स्तुती केली आहे.

रितेश देशमुखचं ट्विट-

‘कृपया स्वत:वर उपकार करा आणि थिएटरमध्ये जाऊन झुंड हा चित्रपट बघा. नागराज मंजुळे हा देशातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे. तो तुम्हाला रडवतो, हसवतो, वेदनांचा अनुभव देतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो तुम्हाला समाजाच्या भिंतीने विभागलेल्या दोन विभिन्न भारतांचा विचार करायला भाग पाडतो,’ असं त्याने म्हटलंय.

नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.

हेही वाचा:

कोण आहेत विजय बारसे? ज्यांच्यावर नागराज मंजुळेंनी बनवला ‘झुंड’ चित्रपट

सोलापुरात नागराजच्या ‘झुंड’ची जादू; 15-16 वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवलं!

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.