Riteish-Genelia : 13 वर्षांनंतर रितेश देशमुखने घेतला अयाज खानचा ‘बदला’; जाणून घ्या काय आहे प्रकरण

अयाजने रितेशसोबत त्याचा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Riteish-Genelia: Riteish Deshmukh takes 'revenge' of Ayaz Khan after 13 years; Find out what's the case)

Riteish-Genelia : 13 वर्षांनंतर रितेश देशमुखने घेतला अयाज खानचा 'बदला'; जाणून घ्या काय आहे प्रकरण
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 12:57 PM

मुंबई : बॉलिवूड स्टार रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याची पत्नी जिनिलिया डिसूझावर (Genelia Deshmukh) खूप प्रेम करतो. बी-टाऊनमध्ये रितेश आणि जेनेलियाच्या प्रेमाच्या चर्चा खूप आहेत. दोघांनीही आपल्या करिअरच्या सुरुवातीला भरपूर धमाकेदार चित्रपट दिले आहेत. चित्रपटांदरम्यान, 13 वर्षांपूर्वी अभिनेता अयाज खानने जिनिलियासोबत असं काही केलं, जे रितेश देशमुख विसरलेला नाही आणि आता इतक्या वर्षानंतर त्याने ‘बदला’ घेतला.

वास्तविक, जिनिलिया डिसूजाने अयाज खानसोबत ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात काम केलं आहे. चित्रपटातील एका दृश्यादरम्यान, अदिती (जिनिलिया डिसूजा) हिला तिचा मंगेतर सुशांत (अयाज खान) झापड मारतो. आता रितेश देशमुखने त्याच्याच शैलीत याचा बदला घेतला आहे.

अयाजने रितेशसोबत त्याचा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या वर, त्याने लिहिलं- ‘आणि जेव्हा मला वाटले की द्वेष संपला आहे’. यानंतर, रितेश देशमुख व्हिडीओमध्ये येतो आणि अयाजला एकटा शोधल्यानंतर तो खूप ठोसे मारताना दिसतो. त्यांची हाणामारी फक्त मजेमध्ये आहे, जी अयाजने त्याच्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाशी संबंधित आहे.

हा मजेदार व्हिडीओ शेअर करताना अयाजने लिहिलं – ‘द्वेष कधी थांपेल का?’ त्याने रितेश आणि जिनिलियाला हसत इमोजी शेअर करून टॅग केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayaz Khan (@ayazkhan701)

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख अलीकडेच बिग बींच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये या शोमध्ये  दिसले होते. रितेश अनेक मराठी चित्रपटांसाठी काम करत आहे. त्याचबरोबर अयाज खानबद्दल सांगायचं तर, त्याने बॉलिवूड आणि टीव्ही दोन्हीमध्ये काम केलं आहे. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ते ‘ब्लफमास्टर’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘चश्मे बद्दूर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत. त्याचबरोबर त्यांनी टीव्ही शो ‘दिल मिल गया’, ‘कुलवधू’, ‘परिचय’ सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे.

जिनिलिया डिसूझा-देशमुखबद्दल…

जिनिलिया डिसूझाचा जन्म मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला. घरात जेनेलियाला जीनू नावाने हाक मारली जाते. तिनं प्रामुख्याने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जिनिलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत ‘पार्कर पेन’च्या जाहिरातीत झळकली होती. या जाहिरातीत तिला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यानंतर तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जिनिलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जिनिलियाला रितेश फारसा आवडला नव्हता. पण नंतर रितेशने जिनिलियाला प्रेमात पाडलंच आणि दोघांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांनी लग्न केले. ‘जाने तू या जाने ना’ हा जिनिलियाच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो, ज्यात जेनेलियाने ‘अदिती’ची भूमिका साकारली होती.

संबंधित बातम्या

Oops moment : कोणाचा टॉप घसरला, कोणाची पँट उसवली, टीव्ही अभिनेत्रींना जेव्हा चारचौघात Oops Moment चा सामना करावा लागला

Aryan Khan Drug Case: एनसीबीचा नवा आरोप – आर्यन आणि त्याच्या मित्रांनी ‘डार्कनेट’द्वारे दिले होते ड्रग्जसाठी पैसे

Kaun Banega Crorepati 13 : स्पर्धक आणि त्याच्या पत्नीमधील भांडण ऐकून अस्वस्थ झाले अमिताभ बच्चन, म्हणाले- कोणीतरी वाचवा…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.