Cirkus Teaser | ‘रोहित शेट्टी’च्या सर्कस चित्रपटाचे टीझर रिलीज, पाहा रणवीर सिंहचा अतरंगी लूक
आतापर्यंत अनेक काॅमेडी चित्रपट रोहित शेट्टीने बाॅलिवूडला दिले आहेत.
मुंबई : रोहित शेट्टी परत एकदा प्रेक्षकांना हासवण्यासाठी सज्ज आहे. लवकरच रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापर्यंत अनेक काॅमेडी चित्रपट रोहित शेट्टीने बाॅलिवूडला दिले आहेत. विशेष म्हणजे रोहित शेट्टीच्या या चित्रपटात सर्वांचा आवडता अभिनेता रणवीर सिंह दिसणार आहे. रणवीर सोबतच या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकताच रोहित शेट्टीने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे टीझर पाहून चित्रपटाबद्दलचे क्रेझ अधिकच वाढले आहे.
सर्कस या चित्रपटात रणवीर सिंहचा अतरंगी लूक चाहत्यांना बघायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर रिलीज झालेले काही मोजकेच चित्रपट सोडता इतर चित्रपटांना खास कमाई करण्यात यश मिळाले नाही.
View this post on Instagram
आता त्यामध्येच रोहित शेट्टीचा हा चित्रपट रिलीज होणार असून हा चित्रपट काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 2022 हे वर्ष बाॅलिवूड चित्रपटांसाठी अजिबात चांगले गेले नाहीये. मोठ्या बजेटचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करू शकले नाहीयेत.
चेन्नई एक्सप्रेससारखे हीट चित्रपट बनवणारे चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांचा सर्कस चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सर्कस हा चित्रपट 23 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा युनूस सजवाल यांनी लिहिली आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून चित्रपट बाॅक्स आॅफिसवर जबरदस्त कामगिरी करेल असे सांगितले जात आहे.