Video | चक्क रोहित शेट्टी रणवीर सिंह याला म्हणाला विचित्र प्राणी, वाचा काय घडले?

नुकताच रणवीर सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय.

Video | चक्क रोहित शेट्टी रणवीर सिंह याला म्हणाला विचित्र प्राणी, वाचा काय घडले?
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 5:48 PM

मुंबई : रणवीर सिंह यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सर्कस हा चित्रपट याच महिन्यात 23 तारखेला रिलीज होतोय. रणवीर काही वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. सर्कस चित्रपटाचे टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले असून यामध्ये रणवीरचा लूक जबरदस्त दिसतोय. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, रणवीर आणि दीपिका यांच्या नात्यामध्ये काहीतरी बिनसले असून हे दोघे लवकरच विभक्त होणार आहेत. मात्र नंतर हे कळाले की, या फक्त आणि फक्त अफवा आहेत.

नुकताच रणवीर सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. जो सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सर्कसच्या सेटवरील असून रोहित शेट्टीने हा व्हिडीओ शूट केल्याचे आवाजावरून दिसत आहे.

रणवीर याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी त्याला विचित्र प्राणी असल्याचे म्हणत आहे. रणवीर सिंहसोबतच सर्कस या चित्रपटामध्ये पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत आहे. या व्हिडीओमध्ये पूजा देखील दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रणवीर सिंहच्या पुढे केक आहेत. रणवीरच्या हातामधील प्लेटमधील केक संपल्याने तो पूजा जवळील केक खाण्याचा प्रयत्न करतो. परंतू पूजा त्याला केक देत नाही.

मग रोहित शेट्टी म्हणतो की, विचित्र प्राणी आहे, कितीही खाल्ले तरीही भूकाच राहतो….आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. रणवीरचा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....