एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या RRR या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये RRRचा समावेश झाला आहे. राजामौलींच्या या बिग बजेट चित्रपटाने जरी 500 कोटींपर्यंत गल्ला जमवला असला तरी ‘बाहुबली: द कन्क्लुजन’चा (Baahubali: The Conclusion) पहिल्या वीकेंडचा विक्रम अबाधित राहिला. बाहुबली 2 ने पहिल्या वीकेंडमध्ये 526 कोटी रुपये कमावले होते.
पहिला दिवस- 257.15 कोटी रुपये
दुसरा दिवस- 114.38 कोटी रुपये
तिसरा दिवस- 118.63 कोटी रुपये
एकूण- 490.16 कोटी रुपये
#RRRMovie WW Box Office
Rare milestone of HAT-TRICK + cr
Day 1 – ₹ 257.15 cr
Day 2 – ₹ 114.38 cr
Day 3 – ₹ 118.63 cr
Total – ₹ 490.16 cr#RamCharan #JrNTR— Manobala Vijayabalan (@ManobalaV) March 28, 2022
शुक्रवार- 20 कोटी रुपये
शनिवार- 23.75 कोटी रुपये
रविवार- 30 कोटी रुपये
एकूण- 73.75 कोटी रुपये
25 ते 27 मार्च या वीकेंडमध्ये RRR जगभरात सर्वाधिक कमाई केल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिली. त्यामुळे ‘द बॅटमॅन’च्या पहिल्या वीकेंडच्या कमाईचा विक्रम राजामौलींच्या चित्रपटाने मोडला आहे. के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.
हेही वाचा:
Video: वीर मराठा शोले… ‘RRR’च्या गाण्यात साऊथ सुपरस्टार्सकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
साऊथ सुपरस्टार्सची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; राजामौलींच्या RRRचं जोरदार प्रमोशन