RRR box office collection: पहिल्या वीकेंडमध्ये RRRची दणक्यात कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला
एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'RRR' या चित्रपटाने वीकेंडला दमदार कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने रविवारी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची भारतातील पहिल्या वीकेंडची कमाई ही 73 कोटी रुपये इतकी झाली आहे.
एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने वीकेंडला दमदार कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर, रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने रविवारी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची भारतातील पहिल्या वीकेंडची कमाई ही 73 कोटी रुपये इतकी झाली आहे. अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’पेक्षा हा आकडा थोडा कमी आहे. ‘सूर्यवंशी’ने पहिल्या वीकेंडला 77 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. जगभरात या चित्रपटाने दणक्यात कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी RRR ने जगभरात 257 कोटी रुपयांची कमाई केली आहे. के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. (RRR box office day 3 collection)
RRRची कमाई-
शुक्रवार- 20 कोटी रुपये शनिवार- 23.75 कोटी रुपये रविवार- 30 कोटी रुपये एकूण- 73.75 कोटी रुपये
RRR हा तेलुगू चित्रपट हिंदीतही डब करण्यात आला आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने राजामौलींच्याच ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. बाहुबली 2 ने पहिल्या दिवशी जगभरात 224 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर RRR ने 257 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘इगा’ (मख्खी), ‘मगधीरा’, ‘बाहुबली: द बिगनिंग’, ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ यांसारख्या लार्जर दॅन लाईफ चित्रपटांनंतर त्यांचा RRR हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2017 मध्ये ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ प्रदर्शित झाला. त्यानंतर RRR हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्यामागे त्यांची पाच वर्षांची मेहनत आहे आणि ही मेहनत पडद्यावर दिसून येते.
हेही वाचा:
Video: वीर मराठा शोले… ‘RRR’च्या गाण्यात साऊथ सुपरस्टार्सकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
साऊथ सुपरस्टार्सची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; राजामौलींच्या RRRचं जोरदार प्रमोशन