RRR | आलियाच्या ‘सीता’ लूकची पहिली झलक, चाहते आता आणखी उत्सुक!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज (15 मार्च) वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया तिच्या चाहत्यांसह एक मोठे सरप्राईज शेअर करणार आहे.

RRR | आलियाच्या ‘सीता' लूकची पहिली झलक, चाहते आता आणखी उत्सुक!
आलिया भट्ट
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 11:29 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) आज (15 मार्च) वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया तिच्या चाहत्यांसह एक मोठे सरप्राईज शेअर करणार आहे. मात्र, या सरप्राईज आधी आलियाने त्याची एक झलक तिच्या चाहत्यांसमवेत शेअर केली आहे. आम्ही ‘आरआरआर’ चित्रपटातील आलिया भट्टच्या फर्स्ट लूकबद्दल बोलत आहोत. काही दिवसांपूर्वी अशी घोषणा करण्यात आली होती की, 15 मार्च रोजी म्हणजेच आलिया भट्ट हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘आरआरआर’ मध्ये ती साकारात असलेली सीतेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली जाईल (RRR movie alia bhatt sita character first look).

अभिनेत्री आलिया भट्ट एसएस राजामौलीच्या चित्रपटाद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण करत आहे, ज्याबद्दल ती आणि तिचे चाहते खूपच उत्साही आहेत. तिच्या वाढदिवसाच्या आधी, 14 मार्चच्या रात्री आलियाने तिच्या इंस्टाग्रामद्वारे तिच्या ‘आरआरआर’च्या तिच्या लूकची झलक दाखवली आहे. यात आपण पाहू शकता की, आलिया काळ्या रंगाची छटा असलेल्या ठिकाणी बसली आहे. ही जागा एका मंदिरासारखी दिसते, कारण आलिया एका मूर्तीसमोर बसली आहे, जी माता सीतेची मूर्ती आहे. हा फोटो शेअर करताना आलिया म्हणाली की, तिचा संपूर्ण लूक उद्या म्हणजेच सोमवारी प्रदर्शित होईल.

पाहा आलियाचा लूक

(RRR movie alia bhatt sita character first look).

एस. एस. राजामौलीच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने मोठा पडदा चांगलाच गाजवला होता. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. यानंतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार्स अर्थात ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेता राम चरण या पीरियड ड्रामामध्ये प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर हा चित्रपट चांगला चर्चेत आला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत (RRR movie alia bhatt sita character first look).

चित्रपटाचे हक्क विक्रीला

‘आरआरआर’ हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी आतापर्यंत 348 कोटीहून अधिकच्या ऑफर आल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनंतर चाहते या चित्रपटाविषयी खूप उत्सुक झाले आहेत. आरआरआरला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे

चांगला गल्ला जमवणार!

खास गोष्ट म्हणजे ‘बाहुबली 2’च्या रिलीजपूर्वी या आकड्याला मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण-भाषिक राज्यांमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले होते. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रिलीज झाल्यानंतर ‘आरआरआर’ चांगलाच गल्ला जमवणार आहे. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.

(RRR movie alia bhatt sita character first look)

हेही वाचा :

Birthaday Special | करिअरच्या उच्च शिखरावर असताना का झाला इंडस्ट्रीमधून गायब?, वाचा हनी सिंगबद्दल…  

Video : जीव झाला येडापिसा रात रात जागनं….शालूची ही झकास अंदा पाहिली का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.