RRR Movie | ‘आरआरआर’ चित्रपटाचे प्रदर्शन आणखी लांबणीवर, निर्मात्यांनी जाहीर केले अधिकृत निवेदन!

अभिनेता राम चरण आणि जूनियर एनटीआरचे चाहते, त्यांच्या आगामी ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चित्रपटाची रिलीज डेट आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे.

RRR Movie | ‘आरआरआर’ चित्रपटाचे प्रदर्शन आणखी लांबणीवर, निर्मात्यांनी जाहीर केले अधिकृत निवेदन!
RRR
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 5:36 PM

मुंबई : अभिनेता राम चरण आणि जूनियर एनटीआरचे चाहते, त्यांच्या आगामी ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चित्रपटाची रिलीज डेट आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी हा चित्रपट 13 ऑक्टोबरला रिलीज होणार होता.

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाची रिलीज डेट दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी जुलैमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. जो 13 ऑक्टोबर 2021पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. आता रिलीजची तारीख आणखी वाढवण्यात आली आहे. देशातील चित्रपटगृहे पूर्णपणे न उघडल्याने निर्मात्यांनी ही तारीख आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्मात्यांनी जाहीर केले अधिकृत निवेदन!

RRR च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, ‘आरआरआर चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन ऑक्टोबर 2021 पर्यंत पूर्ण होईल. पण बऱ्याच जणांना माहिती आहे की, आम्ही चित्रपटाची रिलीज पुढे ढकलतोय. पण, चित्रपटगृहे पूर्णपणे खुली नसल्याने नवीन रिलीजची तारीख इतक्यात जाहीर करू शकत नाही. चित्रपटगृह पूर्णपणे उघडताच आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू.’

पाहा पोस्ट :

‘आरआरआर’ हा चित्रपट एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. ज्यात अभिनेता राम चरण आणि जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत अभिनेत्री आलिया भट्ट आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण देखील या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील आलिया भट्टचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला आहे.

चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

‘आरआरआर’ चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे शूटिंग संपल्याची माहिती जाहीर केली होती. या चित्रपटातील पहिले गीत ‘दोस्ती’ही रिलीज करण्यात आले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित अपडेट शेअर करून प्रेक्षकांना आणखी उत्सुक केले आहे. चित्रपटाशी संबंधित अद्यतने सामायिक करून, चाहत्यांमध्ये याबद्दल उत्साह आणखी वाढतो आहे.

RRR  या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबर 2018 पासून सुरू झाले होते. ‘बाहुबली’ सीरीजनंतर एसएस राजामौलींचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 10 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. RRR हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे बजेट 400 कोटी आहे.

प्रदर्शनापूर्वी कोट्यवधींची कमाई

एस. एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली.

केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी या चित्रपटाला आतापर्यंत 348 कोटीहून अधिक ऑफर मिळाल्या आहेत. जेव्हापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून चित्रपटाला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. निजाममध्ये 75 कोटी, आंध्र प्रदेशात 165 कोटी, तामिळनाडूमध्ये 48 कोटी, मल्याळममध्ये 15 कोटी आणि कर्नाटकमध्ये 45 कोटी हा सर्व आकडा मिळून 348 कोटी रुपये होत आहे. तसेच या चित्रपटाला बॉलिवूडकडून देखील मोठ्या ऑफर्सही मिळत आहेत.

हेही वाचा :

Kangana Ranaut : जयललिता असत्या तर कंगनाऐवजी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली असती बायोपिकमध्ये काम करण्याची पहिली संधी

Gautami Deshpande: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार… गौतमी देशपांडेचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहाच!

Sapna Choudhary | आधी अपघाती मृत्यूच्या अफवेची जोरदार चर्चा, आता सपना चौधरीच्या नव्या व्हिडीओमुळे चाहते आनंदी! 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.