AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RRR | आलिया भट्टच्या वाट्यालाही ‘सीते’ची भूमिका, मार्चमध्ये चाहत्यांना मिळणार मोठे सरप्राईज!

दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये आलिया भट्ट लवकरच सीतेची भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे.

RRR | आलिया भट्टच्या वाट्यालाही ‘सीते’ची भूमिका, मार्चमध्ये चाहत्यांना मिळणार मोठे सरप्राईज!
आलिया भट्ट
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 9:13 AM

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आजकाल तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी खूप व्यस्त आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये आलिया भट्ट लवकरच सीतेची भूमिका साकारणार असल्याचे कळते आहे. नुकतीच आलिया हैदराबादलाही गेली होती. जिथे तिने दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांची खास भेट घेतली. त्याचा एक फोटो आलिया सोशल मीडियावरही शेअर केला आहे. आलिया भट्ट या दमदार चित्रपटाद्वारे दक्षिण मनोरंजन विश्वामध्ये डेब्यू करणार आहे (RRR movie update Alia Bhatt will play Sita character).

या चित्रपटात आलियाचे नाव सीता असणार आहे. या चित्रपटातील आलिया भट्टचा पहिला लूक 15 मार्च रोजी अर्थात आलिया भट्टच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण एकत्र मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.

एस. एस. राजामौलीच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने मोठा पडदा चांगलाच गाजवला होता. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. यानंतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार्स अर्थात ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेता राम चरण या पीरियड ड्रामामध्ये प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर हा चित्रपट चांगला चर्चेत आला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पाहा पोस्टर :

(RRR movie update Alia Bhatt will play Sita character).

चित्रपटाचे हक्क विक्रीला

‘आरआरआर’ हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी आतापर्यंत 348 कोटीहून अधिकच्या ऑफर आल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनंतर चाहते या चित्रपटाविषयी खूप उत्सुक झाले आहेत. आरआरआरला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे (RRR movie update Alia Bhatt will play Sita character).

खास गोष्ट म्हणजे ‘बाहुबली 2’च्या रिलीजपूर्वी या आकड्याला मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण-भाषिक राज्यांमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले होते. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रिलीज झाल्यानंतर ‘आरआरआर’ चांगलाच गल्ला जमवणार आहे.

दक्षिणेमध्ये ‘इतक्या’ कोटींना विकले गेले हक्क

निजाम – 75 कोटी रुपये

आंध्र प्रदेश – 165 कोटी रुपये

तामिळनाडू – 48 कोटी रुपये

मल्याळम – 15 कोटी रुपये

कर्नाटक – 45 कोटी रुपये

ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.

(RRR movie update Alia Bhatt will play Sita character)

हेही वाचा :

Bollywood Corona | मनोरंजन विश्वात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे आणखी दोन मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!

Jackie shroff | बॉलिवूडच्या ‘भिडू’चा असाही दिलदारपणा! घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ!

'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.