नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसची विनर रुबीना दिलैकच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिच्या कारचा चक्काचूर झाला आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुबीना या अपघातातून थोडक्यात बचावली असून तिची प्रकृती चांगली आहे. रुबीनाचा पती अभिनव शुक्ला यानेच याची माहिती दिली आहे. ही माहिती ऐकल्यानंतर रुबीनाच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
रुबीनाचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला याने या अपघाताची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे आपल्या पत्नीच्या कारचा अपघात झाल्याचं अभिनव शुक्लाने सांगितलं आहे. त्याने एक ट्विट करत याची माहिती दिली आहे. या ट्विटमधून अभिनवने संताप व्यक्त केला आहे. या ट्विटमधून अभिनवने कार चालवताना फोनवर बोलणाऱ्या सर्वांना झापलं आहे.
रुबीना सोबत जे झालं ते कुणाबाबतही घडू शकतं, असं अभिनवचं म्हणणं आहे. ट्रॅफिक लाईवटर फोनवरून जे लोक बोलतात आणि सिग्नल जंप करतात अशा मूर्ख लोकांपासून सर्वांनी सावध राहावं, असं त्याने म्हटलं आहे. त्यानंतर त्याने रुबीनाच्या हेल्थची अपडेटही दिली आहे. रूबीनाची प्रकृती ठिक आहे. तिच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती लवकरच देऊ, असं त्याने म्हटलं आहे.
Happened to us, can happen to you. Beware of idiots on the phone jumping traffic lights. To top it up standing there smiling. More details later. Rubina was in car she is fine, taking her for medical. @MTPHereToHelp @MumbaiPolice request you to take strict action ! @RubiDilaik pic.twitter.com/mOT5FPs4Vo
— Abhinav Shukla (@ashukla09) June 10, 2023
रुबीना कारमधून प्रवास करत होती. त्यावेळी तिचा अपघात झाला. आता तिला रुग्णालयात घेऊन जात आहे, असं त्याने म्हटलं आहे. अभिनवने या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे. तसेच कारच्या अपघाताची फोटोही शेअर केली आहे. तसेच या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, या अपघातानंतर रुबीनाकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच तिला किती मार लागला, जखमा किती गंभीर आहेत? तिला कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं काय आहे? ऑपरेशन करण्याएवढी मोठी दुखात नाही ना? आदी माहिती अभिनव किंवा रुबीनाकडून देण्यात आलेली नाहीये.
अभिनव शुक्लाने ट्विटमध्ये कारचे दोन फोटो ट्विट केले आहेत. पुलाखालील रस्त्यावर या दोन कार उभ्या आहेत. या फोटोतून कारचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. रुबीनाच्या कारला एका दुसऱ्या कारने पाठिमागून धडक दिल्याचं दिसून येत आहे. ज्या कारने पाठीमागून धडक दिली, त्या कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. तर रुबीनाच्या कारचा पाठचा भाग बराच डॅमेज झाला आहे. यावरून हा अपघात किती भीषण होता हे दिसून येतंय.