‘साथ निभाना साथिया’मध्ये राशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचा हसबनीस हिने बाळाला दिला जन्म
राशी तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. राशी दुसऱ्यांदा आई झाली आहे. राशीने एका चिमुकल्याला जन्म दिला आहे.
मुंबई : साथ निभाना साथिया या मालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे आपली सर्वांची आवडती राशी आणि खऱ्या आयुष्यातील रुचा हसबनीस चर्चेत आहे. त्याचे झाले असे की, रुचा दुसऱ्यांदा आई झालीये. साथ निभाना साथिया या मालिकेत राशीची भूमिका करत रुचाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राशी तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. राशी दुसऱ्यांदा आई झाली आहे. राशीने एका चिमुकल्याला जन्म दिला आहे.
रुचाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत मुलगा झाल्याची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. राशीची सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. रुचाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केला आहे. पोस्टसोबत रुचाने शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचे पाय दिसत आहेत.
View this post on Instagram
हा फोटो शेअर करताना रुचाने कॅप्शन देत लिहिले की, ‘रूहीची साइड किक आली आहे आणि हा बेबी बॉय आहे….रुचाने पोस्ट शेअर केल्यापासून चाहते यावर कमेंटचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. मात्र, रुचाने बाळाचा चेहरा या फोटोमध्ये दाखवला नाहीये.
रुचाचे काही चाहते बाळाची एक झलक दाखवा, असेही म्हणताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की रुचा लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. रुचा पहिल्यांदा 2019 मध्ये आई झाली होती. यापूर्वी रुचाने एका मुलीला जन्म दिला आहे.